DGP sanjay pandey sakal media
महाराष्ट्र बातम्या

डीजीपी संजय पांडेंचा प्रस्ताव, 'हे' अधिकारी होणार निलंबित?

महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांनी राज्याच्या गृह विभागाला प्रस्ताव दिला आहे.

ओमकार वाबळे

महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांनी राज्याच्या गृह विभागाला प्रस्ताव दिला आहे. यामध्ये आयपीएस अधिकारी परमबीर सिंग आणि अन्य पोलिसांवर नोंदवलेल्या गुन्ह्यांमधील अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची परवानगी मागितली आहे.

या प्रस्तावात परमबिर सिंग या महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असून किमान चार डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच विविध प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून नावाजलेले अनेक एसीपी दर्जाचे अधिकारी असे एकूण 25 हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणांमध्ये आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडे मागवण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांनी या आरोप असलेल्या अधिकाऱ्यांसंदर्भात भूमिका स्पष्ट केल्यानंतर कारवाईचा निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीच्या आधारे अकोला पोलिसांनी परमबीर सिंग आणि इतर 16 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात पहिला एफआयआर नोंदवला.

यानंतर 23 जुलै रोजी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला. दुसऱ्या दिवशी कोपरी पोलिसांनी दुसरा एफआयआर नोंदवला. यानंतर पोलीस खात्यातील अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

PMC power saving deal flop: वीज बचतीचा 'महा-फ्लॉप' करार - महाप्रितला भार सोसेना

Gadhinglaj MIDC Industrial Growth Analysis : कोल्हापूर, कागल एमआयडीसी 'फुल्ल'! गडहिंग्लजमध्ये सात हेक्टर जागा शिल्लक; नव्या उद्योगांसाठी मोठी संधी

सोलापूरच्या सुपूत्राच्या ‘मदार’ चित्रपटाने पाणावले डोळे! पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, फ्रान्सच्या ‘कान्स’ महोत्सवात कौतूक, वाचा...

SCROLL FOR NEXT