Dhammachakra Pravartan Din  sakal
महाराष्ट्र बातम्या

Dhammachakra Pravartan Din 2023: ...म्हणून साजरा केला जातो 'धम्मचक्र प्रवर्तन दिन', काय आहे यामागचा इतिहास?

महाराष्ट्रासह देशभरातील बाबासाहेबांचे लाखो अनुयायी या दिवशी नागपूरला येतात.

Aishwarya Musale

बौद्ध धर्मियांचा एक महत्त्वाचा सण म्हणजे, धम्मचक्र प्रवर्तन दिन. दरवर्षी भीम अनुयायी हा सण 14 ऑक्टोबर किंवा विजयादशमी दिवशी साजरा करतात. 

भारतात 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' हा साजरा केला जाणारा महत्वाचा उत्सव आहे. महाराष्ट्रासह देशभरातील लाखो अनुयायी या दिवशी नागपूरला येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर इथं आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला.

म्हणून हा दिवस 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' म्हणून साजरा केला जातो. दरम्यान, या निमित्तानं आपण 'धम्मचक्र प्रवर्तन दिना'चा इतिहास जाणून घेऊया.

काय आहे इतिहास ?

बौद्ध धर्मियांसाठी 14 ऑक्टोबर हा दिवस खास आहे, कारण हा दिवस अनेकांना बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देणारा आहे. अशोक विजयादशमीचं औचित्य साधत 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पाच लाखांपेक्षा जास्त अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता.

बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत 'धम्मचक्र प्रवर्तन' केलं म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.

सम्राट अशोका यांनी इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो. याच दिवसाचं औचित्य साधत 1956 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर तारखेला नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर सुमारे 5 लाख अनुयायींसोबत डॉ. आंबेडकरांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी, नागपूर येथे व्यापक प्रमाणात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध अनुयायी सहभागी होतात. 2 ऑक्टोबर 2006 रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशांतील 10 लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती. सन 1957 पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cancer Drug Price Hike: कॅन्सर उपचार होणार महाग! जीवनावश्यक औषधांच्या किमती 50% पर्यंत वाढण्याची शक्यता; केंद्र सरकारची मंजुरी

Young Officer ACB Trap : निवडणूक काळातील बिलासाठी तरूण अधिकाऱ्याने तब्बल ५० हजार लाच घेतली, एसीबीने आवळल्या मुसक्या, जतमधील घटना

Pune Crime : पुण्यात खळबळजनक घटना ! जिम मालकावर चार अल्पवयीन मुलांनी झाडल्या गोळ्या, धक्कादायक कारण आले समोर

FIFA World Cup 2026: अमेरिकेत युरोपियन क्रांतीची चाहूल! फ्रान्स, स्पेन, इंग्लंडमध्ये रस्सीखेच, तर अर्जेंटिना, ब्राझीलचा लागणार कस

India Energy Supply : भारतावर नवं मोठं संकट ! एलपीजीसह पेट्रोल- डिझेलवर होणार परिणाम; कृषी क्षेत्रालाही बसणार फटका

SCROLL FOR NEXT