Dhananjay Munde 
महाराष्ट्र बातम्या

भाजपच्या दिग्गज नेत्याची भेट घेऊन धनंजय मुंडे अजित पवारांच्या कार्यालयात दाखल | Dhananjay Munde

राज्यात सध्या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

दत्ता लवांडे

राज्यात सध्या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादीतील ५३ आमदारांपैकी ४० आमदार घेऊन भाजपसोबत नवं सरकार स्थापन करणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सुरू आहेत. त्याचबरोबर त्यांनी आज राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठकही मुंबईत बोलावली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हेसुद्धा काही वेळासाठी नॉट रिचेबल असल्याने चर्चांना उधाण आलं होतं. मुंडे हे भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयात सकाळी दाखल झाले होते. मंत्रालयातील लोढा यांच्या कार्यालयातील धनंजय मुंडे यांचे फोटो समोर आले असून लोढा यांच्या भेटीनंतर ते आता अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात दाखल झाले आहेत.

'मी माझ्या कामाची स्थगिती उठवण्यासाठी आलो होतो, यानिमित्त मी अजित पवार यांच्याशी चर्चा केली' असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. पण त्यांनी अजित पवार यांची भेट घेण्याआधी लोढा यांच्या कार्यालयात जाऊन लोढा यांच्या सचिवाची भेट का घेतली असा सवाल उपस्थित करण्यात येत असून या सगळ्या राजकीय घडामोडीत पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.

अजित पवार यांनी आपल्या ४० आमदारांच्या सह्या घेतल्या असून ते भाजपसोबत जाणार असल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्रातून देण्यात आली होती. यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती दिशा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT