Dhananjay Munde|Bajrang Sonawane Esakal
महाराष्ट्र बातम्या

Dhananjay Munde: बीडवासीयांनो, माझी हात जोडून विनंती... व्हिडिओ पोस्ट करत धनंजय मुंडे असे का म्हणाले?

Bajrang Sonawane: दरम्यान पंकजा यांच्या पराभवानंतर आणि सोनावणे यांच्या विजयानंतर बीड परिसरात काही चुकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तेथिल समाजिक सौहार्द काही प्रमाणात बिघडले आहे.

आशुतोष मसगौंडे

यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा 4 जून रोजी निकाल लागला. यांमध्ये देशात एनडीएला निसटले बहुमत मिळाले. तर, राज्यात महाविकास आघाडीने भाजपसह महायुतीचा सुपडा साफ केला. यामध्ये भाजपच्या अनेक दिंग्गज नेत्यांना पराभव चाखावा लागला.

भाजपच्या पराभूत झालेल्या बड्या नेत्यांमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. गेल्या विधानसभेला पराभव स्वीकारलेल्या पंकजा यांना लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणे यांनी पराभूत केले आहे.

दरम्यान पंकजा यांच्या पराभवानंतर आणि सोनावणे यांच्या विजयानंतर बीड परिसरात काही चुकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तेथिल समाजिक सौहार्द काही प्रमाणात बिघडले आहे.

या सर्वांची दखल घेत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडवासियांना आवाहन करत हा सर्व प्रकार थांबण्यात यावा अशी विनंती केली आहे.

रीव्हॉल्व्हर प्रकरणी काय म्हणाले मुंडे?

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. मी 1995 पासून लोकसभा निवडणुका पाहत आलो आहे. पण आतापर्यंत अशी निवडणूक कधीच पाहिली नव्हती. आता ही निवडणूक पार पडली आहे. जनतेचा कौल उमेदवारानेही आणि आम्ही मान्य केला आहे. असे असूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून मतमोजणीदिवशी मी मतदान केंद्रावर रीव्हॉल्व्हर काढली, कोणावर तरी हात उगारला हे अतिशय खोटे आहे.

या अशा अफवा पसरवणे म्हणजे जाती-पातींमध्ये द्वेष पसरवणे आहे. मी पालकमंत्री असल्याने मला मतदान केंद्राच्या परिसरात जाता येत नाही असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्यामुळे मी तिथे नसतानाही मी काही केले असे आरोप होत आहेत, असे मुंडे पुढे म्हणाले.

हात जोडून विनंती...

बीडच्या जनतेला आवाहन करताना धनंजय मुंडे म्हणाले, त्यावेळी मतदान केंद्रावर दोन्हीकडील नेते, कार्यकर्ते होते. त्यामुळे मी असे काही केले असते तर ते लपले नसते. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की, हे अपप्रचार बंद करा. त्याचबरोबर माझी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की, हे सर्व आता बंद करा. निवडणूक झाली असून, आता सलोखा राखण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला पाहिजे.

आमची प्रतिमाही...

सोशल मीडियाबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, काही दिवसांपासून सोशल मीडियावरून समाजिक सालोखा बिघडवला जातोय. इंतकेच नव्हे तर सोशल मीडियावरून आमची प्रतिमाही बिघडवली जात आहे. त्यामुळे माझी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की पुरोगामी महाराष्ट्रात समाजिक सलोखा जपणे आपले कर्तव्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT