Dhananjay Munde 
महाराष्ट्र बातम्या

Dhananjay Munde : बोगस लिपिक भरती प्रकरणावर धनंजय मुंडेंनी दिली महत्त्वाची माहिती

धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस भरती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस भरती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या माहितीनंतर धनंजय मुंडे यांनी आता या प्रकरणावर महत्त्वाचा खुलासा केला आहे.

थेट मंत्रालयातून या बनावट भरतीचे रॅकेट चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गोवंडी पोलिस स्थानकात मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणावर बोलताना मुंडे काय म्हणाले?

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

या प्रकरणात निखिल माळवे, शुभम मोहिते आणि निलेश कुडतकर अशा तीन आरोपींची नावे समोर आली असून, यांपैकी कोणत्याही व्यक्तीचा आपल्याशी किंवा तत्कालीन मंत्री कार्यलयाशी कसलाही संबंध नाही. अशी महत्त्वाची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी संबंधित ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील आपण बोलणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

बोगस रॅकेट चालवल्याप्रकरणी गोवंडी पोलिस स्थानकात मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेतून सेवा निवृत्त झालेल्या यशवंत कदम यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. या घोटाळ्यात गोवंडीमधील एका तरुणाची सात लाखांहून अधिक रुपायाची फसवणूक झाली होती.

या बोगस लिपिक भरती प्रकरणी माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करत नियुक्ती आदेशाचे बनावट पत्र देण्यात आले होते. याप्रकरणी निखिल माळवे, शुभम मोहिते आणि नीलेश कुडतरकरविरोधात गुन्हा नोंदवत माळवेला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT