Gopinath Munde And Dhananjay Munde esakal
महाराष्ट्र बातम्या

गोपीनाथराव मुंडे हे आज हयात असते तर... : धनंजय मुंडे

'मुंडे हे सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्व होते.'

प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : गोपीनाथराव मुंडे हे आज हयात असते तर मागच्या ५-६ वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात जे बदल घडले आहेत, ते कदाचित घडले नसते. राजकारणातील सौहार्द कायम टिकून राहिले असते, असे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. मी स्वर्गीय मुंडेंसोबत अनेक वर्ष सावलीसारखा सोबत राहिलो. त्यांच्या संघर्षाच्या काळात देखील मी क्षणोक्षणी सोबत होतो, असे म्हणत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. (Dhananjay Munde Remembering His Uncle Gopinath Munde's Death Anniversary)

शुक्रवारी (ता.तीन) गोपीनाथगड (पांगरी) येथे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त धनंजय मुंडे यांनी गोपीनाथगडावरील स्मृतिस्थळी अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. स्व. मुंडे हे सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्व होते. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी संघर्ष केला. त्यांचा बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाची प्रगती, ऊसतोड कामगारांचे कल्याण हे स्वप्न उराशी बाळगुनच मी काम करतो आहे.

ऊसतोड कामगार महामंडळाची अधिकृत स्थापना देखील झाली असून, आता कामगारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रगतीचे स्वप्न देखील पूर्ण करणार असल्याचा निर्धार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. यावेळी अमरसिंह पंडित, अजय मुंडे, अभय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, बाजार समितीचे संचालक सूर्यभान मुंडे, पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माणिक फड, चंद्रकांत कराड, अय्युब भाई पठाण, चंद्रकांत फड, गोविंद कराड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT