महाराष्ट्र बातम्या

Dhangar Reservation : उधळलेला भंडारा विखे पाटलांनी खंडोबाचा आशिर्वाद समजावा; पडळकरांची प्रतिक्रिया

रवींद्र देशमुख

Mumbai News - राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना आता धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येण्यास सुरुवात झाली आहे. धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकल्याचा प्रकार आज घडला. यावर भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, मल्हारी मार्तंडाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा ‘भंडारा हा समस्त बहुजन समाजासाठी आस्थेचं आणि श्रद्धेचं प्रतिक आहे. त्याचा आंदोलनासाठी वापर करणे योग्य नाही. जर काही लोकांनी तो विखे पाटलांवर उधळला असेल तर मी विखे पाटलांना विनंती करतो की, तो खंडोबाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा आशिर्वाद समजून कपाळाला लावावा.

पडळकर यांनी यावेळी शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला. मी समस्त माझ्या बंधू-भगिनींना आवाहन करतो की लबाड लांडगा काकाच्या नादाला लागू नका. धनगर आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या आपण सर्वोच्च न्यायालयात लढत आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला सहकार्य मिळत आहे. त्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल, असंही पडळकर यांनी म्हटलं.

सोलापूर दौर्‍यावर असताना शासकीय विश्रामगृहात धनगर कार्यकर्ते शेखर बंगाळे यांच्या नेतृत्वात काही समाज बांधव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन द्यायला गेले होते. त्यावेळी निवेदन वाचत असताना खिशातील भंडारा काढून बंगाळे यांनी पालकमंत्री विखे पाटलांच्या अंगावर उधळत आरक्षण देण्याच्या घोषणा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम INDIA ची एन्ट्री पक्की? फक्त 'या' ३ गोष्टी आणि इतिहास घडणार!

NEET-UG पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल; १७ वर्षीय विद्यार्थ्यानं सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं

क्रीडा विश्वातील 'शू सायन्स': खेळाडूंच्या बुटांचे तळवे प्रत्येक खेळानुसार का बदलतात ? जाणून घ्या त्यामागचं विज्ञान!

Viral Video: ''सगळ्यांना पप्पा आहेत.. मम्मी म्हणत होती दारु पिऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाही'', वडिलांच्या फोटोसमोर चिमुकलीची नाराजी

Latest Marathi News Live Update: ब्रम्हगाव प्रकरणातील मागण्या मान्य; भिमाशंकर यादव यांचे उपोषण स्थगित

SCROLL FOR NEXT