Marathwada News esakal
महाराष्ट्र बातम्या

Marathwada News: टेलरने वेळेवर ब्लाऊज दिला नाही, महिला ग्राहक मंचात; बसला मोठा दंड

Dharashiv Latest Marathi News:तक्रारदार महिलेचं नाव स्वाती प्रशांत कस्तुरे असं आहे. या महिलेने जानेवारी २०२३मध्ये धाराशिव शहरातील नेहा संत टेलरिंग या दुकानामध्ये दोन ब्लाऊज शिवण्यासाठी दिले. दुकान चालवणाऱ्या महिला टेलरने वेळेत ब्लाऊज दिले नाहीत. विशेष म्हणजे तक्रारदार महिलेने बिलापोटी अॅडव्हान्स म्हणून ३ हजार रुपये जमाही केले होते.

संतोष कानडे

Dharashiv News: टेलरकडे शिवायला टाकलेला ब्लाऊज वेळेवर न दिल्याने एका महिलेने टेलरविरोधात ग्राहक मंचामध्ये धाव घेतली होती. त्या टेलरला ग्राहक मंचाने दंडाच्या शिक्षेसह अन्य शिक्षा सुनावली आहे. ही घटना मराठवाड्यातल्या धाराशिव येथे घडली आहे.

अॅडव्हान्स पैसे देऊनही वेळेमध्ये ब्लाऊज शिवून न दिल्याने संतापलेल्या महिलेने ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये धाव घेतली होती. ग्राहक मंचाने सदरील महिला टेलरला पंधरा हजार रुपये दंड आणि शिक्षा म्हणून राहिलेला ब्लाऊज मोफत शिवून देण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रारदार महिलेचं नाव स्वाती प्रशांत कस्तुरे असं आहे. या महिलेने जानेवारी २०२३मध्ये धाराशिव शहरातील नेहा संत टेलरिंग या दुकानामध्ये दोन ब्लाऊज शिवण्यासाठी दिले. दुकान चालवणाऱ्या महिला टेलरने वेळेत ब्लाऊज दिले नाहीत. विशेष म्हणजे तक्रारदार महिलेने बिलापोटी अॅडव्हान्स म्हणून ३ हजार रुपये जमाही केले होते.

टेलर नेहा संत यांनी स्वाती या तक्रारदार महिलेचे ब्लाऊज वेळेमध्ये दिले नाहीत. त्यांच्याशी विविध माध्यमांद्वारे संपर्क केला मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे स्वाती यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये धाव घेतली. २८ एप्रिल २०२३ रोजी त्यानी वकिलांमार्फत तक्रार दिली.

ग्राहक मंचाकडून नेहा संत यांना अनेक नोटिशी पाठवण्यात आल्या होत्या. मात्र त्या सुनावणीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे ग्राहक मंचाने एकतर्फी आदेश देत नेहा संत यांना १० हजार रुपये दंड आणि तक्रारीच्या खर्चापोटी ५ रुपये स्वाती यांना देण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहक मंचाच्या दणक्याने एका दुकानदाराला अद्दल घडवल्याने ग्राहकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT