dhfl fraud 
महाराष्ट्र बातम्या

सुशीलकुमार शिंदेंची मुलगी, जावयाची मालमत्ता ईडीने केली जप्त

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रीती श्रॉफ व जावई राज श्रॉफ यांच्या ‘जिंदाल कम्बाईन्स प्रा. लि.’ व ‘ऑरलॅंडो ट्रेडिंग प्रा. लि.’शी संबंधित ३५ कोटी ४८ लाखांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) टाच आणली आहे. ‘एचडीआयएल’चे राकेश वाधवा व सारंग वाधवा बॅंक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने ही कारवाई केली. या मालमत्तेमध्ये अंधेरी येथील कालेंडोनिया इमारतीतील दोन व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्ता प्रत्येकी १० हजार ५५० चौरस फुटाच्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

एचडीआयएल प्रकरणातील तपासात येस बॅंकेने २०० कोटी रुपये मॅकस्टार मार्केटिंगला दिले होते, असे निष्पन्न झाले होते. ही रक्कम ज्या कामासाठी घेतली, तिथे न वापरता इतर कामासाठी वापरून व्यवहारात आणल्याचे ‘ईडी’च्या तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी सखोल तपासानंतर या मालमत्तांवर टाच आणण्यात आली. त्यातील एक व्यावसायिक मालमत्ता २०१४ मध्ये ‘जिंदाल कॉम्बाइन्स प्रा. लि.'ला नऊ कोटी ३९ लाख (त्या वेळी रेडिरेकनर मूल्य १५ कोटी ६४ लाख रुपये) आणि २०१६ मध्ये ‘ऑरलॅंडो ट्रेडिंग प्रायव्हेट’ला आणखी एक व्यावसायिक मालमत्ता १८ कोटींना (रेडीरेकनर मूल्य १९ कोटी ८४ लाख) हस्तांतरित करण्यात आली होती, असे ईडी सूत्रांनी सांगितले.

कंपन्यांची मालकी श्रॉफ पतीपत्नीची
त्यातील केवळ दुसऱ्या मालमत्तेचे १० कोटी रुपये स्वीकारण्यात आले आहेत. या दोन्ही मालमत्ता कंपन्यांना वर्षाकाठी अनुक्रमे एक कोटी ७६ लाख आणि एक कोटी ३९ लाख रुपये भाडे मिळत आहे. या दोन्ही कंपन्या राज श्रॉफ आणि त्याची पत्नी यांच्या मालकीच्या आहेत. अशा प्रकारे राकेश वाधवा आणि सारंग वाधवा यांनी मॅक स्टार मार्केटिंग प्रा. लि. बहुसंख्य भागधारकांच्या (डीई शॉ ग्रुपमध्ये ८३.६६ टक्के समभाग असलेल्या) संमतीविना वरील मालमत्ता बेकायदा कमी किमतीत विकून मॅक स्टारचे नुकसान केल्याचे ईडी सूत्रांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

IND vs WI 2nd T20I: नितीश रेड्डी, प्रिन्स यादव IN, वैभव सूर्यवंशी बाकावरच; दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी Playing XI मध्ये सूचवला बदल

Sangli District Bank Election : आमदार सुरेश खाडेंसह सात जणांचे अर्ज बाद; पडळकर, विशाल पाटील, देशमुख यांना दिलासा, 21 जागांसाठी 295 अर्ज

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल - राहुल गांधी

थिएटर फुटलं, अंधारातून पळालो, नानाने मला रिक्षात टाकलं अन् स्वतः... अशोक मामांनी सांगितला तो प्रसंग, काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT