Businessman Avinash Bhosele arrested Businessman Avinash Bhosele arrested
महाराष्ट्र बातम्या

उद्योगपती अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

आजच्या सुनावणीवेळी सीबीआयने भोसले यांची सीबीआय कस्टडी वाढवून देण्याची मागणी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : येस बँक आणि डीएचएफएल (Yes Bank-DHFL) गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेले बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष सीबीआय न्यायालयाने (CBI Court) दिले आहेत. त्यामुळे भोसले यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. भोसले यांना 26 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने भोसले यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Avinash Bhosale News)

न्यायालयाच्या वरील आदेशानंतर भोसले यांची रवानगी आर्थर रोड (Arthar Road) कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. आजच्या सुनावणीवेळी सीबीआयने भोसले यांची सीबीआय कस्टडी वाढवून देण्याची मागणी केली होती. परंतु, विशेष सीबीआय न्यायालयाने ती मान्य करण्यास नकार दिला. दरम्यान, मुंबईच्या आर्थर रोडमध्ये नव्या कैद्यांसाठी जागा नसल्याने अविनाश भोसलेंना नवी मुंबईत तळोजा कारागृहात हलवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भोसले यांच्या घरावर एप्रिल महिन्यातच सीबीआयने छापे घातले होते. तर मागील वर्षी "सीबीआय'ने त्यांची तब्बल 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास "सीबीआय'कडून सुरु आहे. त्यांनी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे.

दरम्यान, याच बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, "सीबीआय'कडून भोसले यांचा तपास सुरु होता. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिर महिन्यात "सीबीआय'ने छापे टाकून काही मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या मालमत्तांमधून महत्वाची कागदपत्रेही त्यांनी जप्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT