Shirdi Saibaba
Shirdi Saibaba  esakal
महाराष्ट्र

Dhirendra Shastri : बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री पुन्हा नव्या वादात; 'परमात्मा एक सेवक' मंडळावर आक्षेपार्ह टिपण्णी केल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

भंडारा/मोहाडी : मोहाडी येथे बागेश्‍वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी परमात्मा एक सेवक मंडळावर आक्षेपार्ह टिपण्णी केल्याचा दावा करून प्रशासनाने कारवाई न केल्यास आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा आमदार नरेंद्र भोंडकर यांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकारानंतर प्रवचन करताना धीरेंद्र शास्त्री यांनी कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास क्षमा मागतो असे म्हटल्यानंतर तणाव काही प्रमाणात निवळला.

मोहाडीच्या चंदुबाबा स्टेडियमवर २८ मार्चपासून धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनचे आयोजन करण्यात आले आहे. यात त्यांनी दोन दिवस भंडारा आणि नागपूर परिसरात असलेल्या परमात्मा एक सेवक मंडळावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला.

यावरून मोहाडी, लाखांदूर, लाखनी, करडी आणि इतर तालुक्यातही सेवक मंडळींनी पोलिसांत तक्रार करून धीरेंद्र शास्त्री यांना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, आमदार भोंडेकर आणि सेवक परिवारातील पदाधिकाऱ्यांनी सकाळी भंडारा येथे पत्रकार परिषद घेऊन धीरेंद्र शास्त्रींना दुपारपर्यंत अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी भंडारा पोलिसांत तक्रारही केली. दुपारी आमदार भोंडेकर व सेवक मंडळी आपल्या वाहनांतून मोहाडी येथे जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कारधा ठाण्यात आणले.

तिकडे मोहाडी येथील पोलिस ठाण्यापुढे जिल्ह्यातून आलेल्या सेवकांनी मोठी गर्दी केली होती. सेवकांची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सायंकाळी धीरेंद्र शास्त्री यांनी प्रवचनारम्यान कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास क्षमा मागत असल्याचे म्हटल्याने तणाव काहीसा कमी झाले. दुसरीकडे मोहाडी पोलिसांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यातील इतर ठिकाणी उमटण्याची शक्यता असल्याने पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT