Rohidas Patil Passed Away 
महाराष्ट्र बातम्या

Rohidas Patil Passed Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचं निधन; धुळ्यात पक्षाला मिळवून दिली होती भरारी

रोहिदास पाटील यांनी विविध खात्यांमध्ये मंत्रीपद भूषवलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

धुळे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन झालं आहे, ते ८९ वर्षांचे होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे ते महत्वाचे नेते होते. पाटलांमुळं काँग्रेसला धुळ्यात मोठी झेप घेता आली. खान्देशच्या राजकारणात त्यांचं स्वतःचं एक राजकीय वजन होतं. त्यामुळं त्यांच्या निधनामुळं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

रोहिदास पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या मागे दोन मुलं, मुलगी, सुना आणि नातवंडं असा परिवार आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आमदार कुणाल पाटील हे दिवंगत रोहिदास पाटील यांचे पुत्र आहेत. गेल्या काही काळापासून फुफ्फुसाच्या आजारानं ते त्रस्त होते. त्यांच्या निधनामुळं धुळ्याच्या राजकीय वर्तुळात शोकाकुल वातावरण आहे.

शनिवारी, २८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत देवपुरातील सुंदर सावित्री सभागृहात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता देवपूर इथल्या रोहिदास पाटील यांच्या निवासस्थानापासून अत्यंयात्रा निघेल. नंतर एसएसव्हीपीएस कॉलेजच्या ग्राऊंडवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT