Dhule fire 
महाराष्ट्र बातम्या

Dhule wax factory fire: धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्याला भीषण आग; चार महिलांचा होरपळून मृत्यू

इतर जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ डिजिटल टीम

धुळे जिल्ह्यातील चिखलीपाडा इथं एका आगीच्या भीषण दुर्घटनेत चार महिलांना जीव गमवावा लागला आहे. तर एका मुलीसह एक महिला गंभीररित्या जखमी झाल्याचं वृत्त आहे. एका मेणबत्तीच्या कारखान्याला आग लागल्याचं सूत्रांकडून कळतं आहे. जखमींना नंदुरबारच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Dhule wax candle making factory fire four women death others seriously injured)

पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेत आशाबाई भागवत (वय ३४), पुनम भागवत (वय १६), नैनाबाई माळी (वय ४८), सिंधूबाई राजपूत (वय ५५, सर्व रा. जैताणे) या चौघांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच संगीता चव्हाण (वय ५५) ही ७० टक्के, तर निकीता महाजन (वय १८) ही ३० टक्के भाजली आहे. स्पार्कल कॅण्डलचा कारखाना पुणे येथील रोहिणी कुवर यांचा असून, त्याचा कारभार जगन्नाथ कुवर (रा. वासखेडी) पाहात आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. कारखाना चालविण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेतल्या किंवा नाहीत या दिशेनेही पोलिस तपास सुरू आहे. या प्रकरणी गतीने व सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.

निजामपूर क्षेत्रातील चिपलीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील स्पार्कल कॅण्डल (मेणबत्ती) बनविण्याच्या कारखान्याला आग लागल्यानंतर चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. १८) दुपारी घडली. घटनेत अन्य एका महिलेसह मुलगीही गंभीररित्या भाजली आहे. त्यांना नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वाढदिवसासाठी स्पार्कल कॅण्डलचा उपयोग केला जातो, या स्पार्कल कॅण्डल बनविण्याचा कारखाना आदिवासीबहुल चिपलीपाडा परिसरात २५ बाय २५ च्या खोलीत सुरु आहे. या कारखान्यात निजामपूरजवळील जैताणे (ता. साक्री) येथील चार महिला काम करत होत्या. कारखान्यात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास शॉटसर्कीटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. पण कारखान्यात ज्वलनशील पदार्थाचा स्फोट झाला असावा, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT