Maharashtra Village Names
Maharashtra Village Names esakal
महाराष्ट्र

Village Names: महाराष्ट्रातल्या गावांच्या मागे बुद्रुक अन् खुर्द अशी नावे का दिली जातात?

Lina Joshi

Maharashtra Village Names: आपण अनेक गावांच्या मागे खुर्द आणि बुद्रुक असं लिहिलेलं असतं. पण असं का? बरं एका कुणाच्या गावाच्या बाबतीत असेल तर ठिके पण अनेक गावांच्या मागे असं लिहिलं असतं. याबद्दल कधी तुम्ही माहिती काढण्याचा प्रयत्न केला आहे का? याबद्दल जाणून घेऊयाच पण त्याआधी जाणून घेऊ की गावाला गाव हा शब्द कसा पडला.  

गाव हा शब्द कसा तयार झाला याची कहाणी खूप भारी आहे. गाव हा शब्द गाई अथवा गो या शब्दापासून उदयास आला आहे.

याच्या उत्पत्तीची सुरवात करायची झाली तर अश्मयुगापासून करायला लागेल. त्या काळात माणूस जंगलात भटकत होता. कालांतराने शेतीचा शोध लागला आणि माणूस स्थिर झाला. शेतीसाठी बैल हा उपयुक्त पशू. 

आता बैल आला म्हणजे गाय पण आलीच. तर माणूस एका ठिकाणी घर करुन समूहाने राहू लागला आणि आजूबाजूची जागा शेतीसाठी वापरु लागला. या क्षेत्रात गाई चरायला जात.

आत्ता ज्या क्षेत्रात गाई चरायला जात असत ते क्षेत्र गाईचं क्षेत्र म्हणून उल्लेखलं जावू लागलं. त्यावरुनच गाईची सिमा निर्धारित झाली. त्यालाच गावाचे क्षेत्र असे समजले जावू लागले. गाई या शब्दाच्या अपभ्रंशातून गाव हा शब्द तयार झाल्याचं सांगितल जात. 

हा खुर्द आणि बुद्रुक काय प्रकार आहे ?

पूर्वी मुसलमानी अंमल होता तेव्हा उर्दूमिश्रित किंवा फारसीमिश्रित भाषा बोलली किंवा लिहिली जात असे. मोगल किंवा आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही इत्यादी कालखंडामध्ये मुस्लीम अंमलात खुर्द आणि बुद्रुक हे शब्द वापरले जात.

एखाद्या रस्त्यामुळे किंवा नदी, ओढा यामुळे एका गावाचे दोन भाग पडत असले तर ते दोन भाग समसमान कधीच नसत. एक भाग छोटा तर दुसरा मोठा असे.

त्यातील मोठा भाग असलेल्या गावाला बुजुर्ग आणि छोटा भाग असलेल्या गावाला खुर्द असे म्हणत. बुजुर्ग म्हणजे मोठा आणि खुर्द म्हणजे चिल्लर किंवा छोटा अशा अर्थाने त्या गावाच्या दोन्ही भागांना खुर्द किंवा बुद्रुक असे संबोधले जाई.

या ‘बुजुर्ग’चा अपभ्रंश होऊन बुद्रुक हा शब्द तयार झाला आणि ‘खुर्द’चा अपभ्रंश न होता तो तसाच राहिला. आजही आपण खिशात मोठय़ा किमतीच्या नोटा असल्या आणि छोटय़ा किमतीची नाणी खिशात असली तर खिशात पैशांचा खुर्दा वाजतोय असे म्हणतोच. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT