Marathi Bhasha Gaurav Din esakal
महाराष्ट्र बातम्या

Marathi Bhasha Gaurav Din : मराठी भाषा गौरवदिन अन् मराठी राजभाषा दिन फरक माहितीये? जाणून घ्या

Kusumagraj Birth anniversary: ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा होतो.

सकाळ डिजिटल टीम

Kavi Kusumagraj Birth Anniversary : मराठी भाषेला फार जूनी परंपरा आणि वारसा आहे. तशीच मराठी भाषेतील साहित्य परंपरा तेवढीच थोर आणि मोठी आहे. मराठी भाषेची फक्त लोकप्रियता नाही तर प्राचीन ते आधुनिक मराठी साहित्यातही भाषा वाढत गेली. त्याचीच परिणीती हा दिवस आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्म दिवसानिमित्त २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरवदिन साजरा केला जातो. पण काही लोक याला मराठी राजभाषा दिन म्हणतात. पण मराठी राजभाषा दिन १ मे आहे. या दोन्ही दिवसांत नेमका फरक काय, जाणून घेऊया.

मराठी भाषेचे वैशिष्ट्ये

  • मराठी भारतातल्या अधिकृत २२ भाषांपैकी एक आहे.

  • जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी १५ वी भाषा आहे. तर भारतातली तिसरी भाषा आहे.

  • महाराष्ट्र आणि गोव्याची अधिकृत भाषा.

  • मराठी भाषेला दीर्घ साहित्यिक वारसा आणि परंपरा.

कुसुमाग्रजांचे मराठीतले योगदान

  • कविवर्य कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित करण्यात आला होता.

  • कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कुसुमाग्रजांनी मराठी कवितेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले.

  • कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या बोली भाषेला एक वेगळा साहित्य प्रकार म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

  • मराठी ही शिकण्याची भाषा व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

  • कुसुम हे विष्णू वामन शिरवाडकर यांच्या मोठ्या बहिणीचे नाव होते. कुसुमाग्रजांनी आपल्या बहिणीच्या नावावरूनच आपले कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरले.

  • कुसुमाग्रांच्या आत्मत्यागी तेज आणि मिलनसार भावनिक लेखनामुळे त्यांचे लेख हे जागतिक दर्जाचे झाले.

मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरवदिनातील फरक

  • १  मे १९६० रोजी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य बनले. मराठी भाषेला राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्य केले गेले. तेव्हापासून, १ मे हा ‘मराठी राजभाषा दिन’ किंवा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

  • १ मे या एकाच दिवशी मराठी राजभाषा दिन, महाराष्ट्र स्थापना दिन आणि कामगार दिनही साजरा होत होता.

  • १ मे रोजी ‘मराठी राजभाषा दिन’, २१ फेब्रुवारीला ‘जागतिक मातृभाषा दिन’ आणि २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन’ हे तीन वेगवेगळे दिवस आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

SCROLL FOR NEXT