ajit pawar, dilip sopal
sakal
सोलापूर : मी १९८५ साली आमदार होऊन सभागृहात गेलो. दुसरीकडे अजित पवार ११९५ साली पहिल्यांदा आमदार म्हणून सभागृहात आले. मोठ्या पवारसाहेबांच्या जवळचा माणूस अशी माझी ओळख होती. पुढे अजितदादा यांनीच मला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रिपद दिले आणि सोलापूरचे पालकमंत्रीपदही. अजितदादांमुळे मी मंत्री झालो, अशी आठवण माजी मंत्री आमदार दिलीप सोपल यांनी जागवली. वयाने ज्येष्ठ असलो तरी ते (अजित पवार) नेहमीच ज्येष्ठांशी आदराने, सन्मानाने वागवत. आज राज्यासाठी, सोलापूरसाठी आणि माझ्यासाठी आजचा दिवस काळा दिवस आहे.
अजित पवार स्पष्टवक्ते होते, काम करतो करतो म्हणून ते कोणाला नादी लावत नव्हते. काम होणार नसेल तर तोंडावरच हो किंवा नाही म्हणून सांगत होते. ते सकाळी ७ वाजल्यापासूनच कामाला सुरुवात करायचे. पवार हे आमच्यासाठी कुटुंब होते आणि या कुटुंबात मोठे पवारसाहेब असतील वा अजित पवार यांनी कधीच अंतर येऊ दिले नाही. २०१९ ते २०२४ सत्तेपासून दूर असलो तरी त्याची कधीच जाणीव होऊ दिली नाही. मतदारसंघातील कोणतेही काम नेले तरी कधीच काम होणार नाही, बघू, करू असे उत्तर दिले नाही. मी नेहमीच विनोद करायचो, त्यावेळी गंभीर झालेले सगळेच दिलखुलास हसायचे. दादा मला नेहमीच दाद दायचे, अशीही आठवण त्यांनी सांगितली.
पायऱ्यांची उंची जास्त कशी?
नगरपालिकेच्या वतीने उभारलेल्या स्व. अर्जुन बारबोले कॉम्पलेक्सच्या लोकार्पण सोहळ्यास अजितदादा आले होते. पायऱ्या चढून वर जात असताना पायऱ्यांची उंची जास्त झाली असल्याचे सांगून ठेकेदार कोण आहे? अशी विचारणा केली. प्रत्येक गोष्टीत त्यांचे खूप बारकाईने लक्ष ठेवून होते.
‘सकाळी साडेसहा वाजता फोन आणि मी’
अजितदादा सकाळी लवकर कामाला सुरुवात करत असे. मी पाणीपुरवठा मंत्री असताना एका कामासाठी त्यांनी मला सकाळी साडेसहा वाजता फोन केला. पहिला प्रश्न कुठं आहात. त्यांचा फोन मी झोपतेच घेतला आणि उत्तर दिले, कार्यालयाकडे निघालोय. पाणीपुरवठा योजनेचा विषय आहे, काही लोक तुम्हाला भेटतील, ते काम मार्गी लावा, असे ते म्हणाले. मी झोपलो आहे असे सांगितले असते, पण त्यांची काम करण्याची पद्धत आमच्यासारख्यांना आदर्शवतच होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.