Dilip Walse Patil
Dilip Walse Patil Sakal
महाराष्ट्र

वळसे पाटील म्हणतात, 'हिजाब प्रकरणावरून सुरू असलेला गदारोळ दुर्दैवी'

सकाळ डिजिटल टीम

हिजाब प्रकरणाने (Hijab Case) संपूर्ण राज्य ढवळून निघाले असून आता याचे पडसाद देशभरात सगळीकडे उमटू लागले आहेत. या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्यातील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि सामान्य लोकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले. दरम्यान कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून सुरू असलेला गदारोळ दुर्दैवी असल्याचे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी यासंबंधी ट्विट केले आहे.

दरम्यान आज मुंबईत कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब प्रकारणात, मुलींच्या हिजाबच्या हक्कासाठी मुस्लीम महिलांनी स्वाक्षरी मोहिमेत फलक घेऊन सहभाग घेतला. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या वादासंबंधी ट्विट करत सर्व विद्यार्थ्यी, शिक्षक आणि शाळा महाविद्यालयांच्या व्यवस्थापणन तसेच कर्नाटकातील लोकांना शांतता आणि सलेखा राखण्याचे आवाहन केले आहे. सोबतच त्यांनी पुढील तीन दिवस सर्व माध्यमिक शाळा आणि महाविद्यावये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत

वळसे पाटील यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून सुरू असलेला गदारोळ दुर्दैवी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशाप्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत.

वळसे पाटील पुढे म्हणाले की, 'कर्नाटक हायकोर्टात याबाबत सुनावणी सुरू आहे. माझी महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांतील जनतेला विनंती आहे की, या विषयाला फार महत्त्व देऊ नये. तसेच धार्मिक कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य किंवा कृती कुणीही करू नये.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT