महाराष्ट्र बातम्या

पवारांच्या घरावरील हल्ल्याची चौकशी सुरु; गृहमंत्र्यांची माहिती

'याप्रकरणी चौकशी सुरु असुन वस्तुस्थिती समोर आली की प्रतिक्रिया देणार'

सकाळ डिजिटल टीम

'याप्रकरणी चौकशी सुरु असुन वस्तुस्थिती समोर आली की प्रतिक्रिया देणार'

पोलिसांकडून किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. पवारांच्या घरावरील हल्ल्याची रितसर चौकशी सुरु आहे. माहिती मिळेल तशी संबंधितांवर कारवाई सुरु आहे. कायद्याप्रमाणे पोलिस योग्य ती कारवाई करतील असे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. आज ते मुंबईत बोलत होते.

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागील चौकशीसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, पवारांच्या घरी जेवढा बंदोबस्त ठेवायला हवा तेवढा ठेवता आला नाही. यांसंबधित चौकशी केली असून संबंधित डीसीपीची बदली केली आहे. गावदेवी पोलिस स्थानकातील एका पोलिस अधिक्षकलाही निलंबित केलं आहे. त्यामुळे जशी माहिती समोर येईल तशी कारवाई करु, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी सुरु असुन वस्तुस्थिती समोर आली की प्रतिक्रिया देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पुढे ते म्हणाले, गुन्हा दाखल झाल्यापासून सोमय्या पिता पुत्र सापडत नाहीत. मात्र त्यांच्या शोध सुरु आहे. आरोप करणं सोपं असतं. मात्र सिद्ध झाल की समोर यायचं नाही हे लक्षण बरोबर नाही. सोमय्यांशी संपर्क होत नसल्याची गृबविभागाकडून माहिती समोर आली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्य सरकारच्या पोलिस विभागावर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रश्न उद्भवत नाहीस, असेही ते म्हणाले. फोन टॅपिंगबाबत ते म्हणाले, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा फोन पोलिसांनी 60 दिवस टॅपिंगवर ठेवले होता. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन ६७ दिवस टॅपिंगवर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पवार यांच्या घरावर हल्या प्रकरणाची माहिती असूनही सुरक्षा का वाढवली नाही याबाबत समिती संघटन केली असून चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT