Dilip Walse Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का? दिलीप वळसे पाटील स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु नाही, ळसे पाटलांच स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु नाही, ळसे पाटलांच स्पष्टीकरण

राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतील नेत्यांनी गाठीभेटी आणि दौऱ्यांना वेग आला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान, आघाडी सरकार स्थापन होताना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आलं. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे असं साकडं घातलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, आज मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार का? यावर गृहमंत्र्यांकडून पूर्णविराम देण्यात आला आहे.

खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का?, असा सवाल दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु नाही. पुढील पाच वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

यावेळी बनावट नोटांप्रकरणी ते म्हणाले, RBI जाहीर करत असेल बनावट नोटा वाढल्या तर केंद्राने यासंदर्भात भूमिका जाहीर केली पाहिजे. त्यांचे धोरण कुठे चुकले आहे यावर त्यांनी लक्ष दिले पाहिजे. राणा दाम्पत्य प्रकरणासंदर्भातील पोलिस नोटीसबाबत ते म्हणाले, संसदेच्या हक्कभंग कमिटीने नोटीस दिली असून त्यांचा आदर राखून त्यांना म्हणणे मांडण्यात येणार आहे.

हनुमान जनमस्थळ वादासंदर्भात विचारले असता गृहमंत्री म्हणाले, हे सगळ ठरवून चालले आहे. जो विषय आवश्यक नाही असे विषय काढून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काहींकडून सुरु आहे. रामजन्म, हनुमानाचा जन्म कुठे झाला हे महत्वाचे विषय नसून वाढती महागाई हा गंभीर विषय आहे. मात्र असे विषय समोर आणून लोकांचे लक्ष हटवण्याचे काम सुरु आहे. हनुमान जन्म कुठे झालं हे वाद अनावश्यक असल्याने त्याला महत्व देऊ नये. आम्ही लक्ष ठेवू त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेऊ, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Interpol Notices : रेड कॉर्नरपासून ब्लू कॉर्नरपर्यंत; इंटरपोल कधी अन् किती प्रकारच्या नोटीस जारी करते?

Whatsapp आणतंय खास फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच ओपन होणार Facebook, फेक अकाउंटला टाटा बाय बाय..कसं वापरायचं पाहा

Gaza Strip: उद्ध्वस्त घरे अन् अस्वस्थता; गाझा पट्टीत परतलेल्या हजारो पॅलेस्टिनींची भावना

Diwali Festival: बाजारपेठा गजबजल्‍या! दिवाळीच्या खरेदीची लगबग; आज गर्दी वाढणार

Nilesh Ghaiwal सोबत Rohit Pawar यांच्या आईचे फोटो, भाजपवर चांगलेच भडकले | Pune News | Sakal News

SCROLL FOR NEXT