BJP NCP 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : भाजपला धक्का; 'या' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

सातारा : भाजपने सुरू केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला जशास तसे उत्तर देण्यासाठी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत साताऱ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी भाजपचे मागील वेळेचे सातारा विधानसभा मतदार संघातील उमेदवार आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे विरोधक दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये माजी खासदार उदयनराजे भोसले आणि माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पक्षातून फोडण्यात यश मिळविले. या दोन नेत्यांच्या जोरावर जिल्ह्यात भाजपचे आमदार निवडून आणण्याची रणनीती भाजपने आखली आहे. ही रणनीती फेल ठरविण्यासाठी व खासदार, आमदारांच्या पक्ष सोडून जाण्याने अस्वस्थ झालेल्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी शरद पवार यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. युवकांच्या मोटारसायकल रॅलीसह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पदयात्रा काढली होती. ही रॅली जिल्हा परिषद मार्गे रॅली बॉम्बे चौकातून कल्याण रिसॉर्टला गेली, तेथे त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT