dipali sayyed esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिपाली सय्यद म्हणतात, ठाकरे...

संतोष कानडे

मुंबईः ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मागील काही दिवसांपासून सय्यद ह्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर त्यांनी भाष्य केलं आहे.

सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर दिपाली सय्यद ह्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर दिपाली सय्यद म्हणाल्या, शिवसेनेत सुषमा अंधारे आल्या म्हणून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. परंतु प्रत्येकजण आपलं काम करीत असतो. मी जे करतेय ते कामातून लोकांसमोर येत आहे.

यावेळी दिपाली सय्यद यांनी एक सूचक विधान केलं. ''आपण केवळ कृतीतून लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला नेता सपोर्ट करीत असेल तर आपण त्याबरोबर जायला हवं'' असं त्या म्हणाल्या.

''मागील काही दिवसांपासून माझा आवाज मातोश्रीपर्यंत पोहोचत नाही. याबद्दल मी लवकरच बोलेन. मातोश्रीपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. परंतु मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तितकी मेहनत घ्यावी लागत नाही.'' असंही दिपाली सय्यद म्हणाल्या. त्यामुळे त्या शिंदे गटात जाणार, असं दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT