Deepali Sayed
Deepali Sayed  
महाराष्ट्र

Mahila Maharashtra Kesari : कुस्तीच्या पंढरीत दिपाली सय्यदांनी ठाेकला शड्डू; पण...

सकाळ डिजिटल टीम

राज्य कुस्तीगीर परिषद व कुस्ती महासंघाच्या मान्यतेने महिलांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा गुरुवार (ता. २३) व शुक्रवार (ता. २४) रोजी होत असल्याची माहिती कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी दिली. पण कुस्तीचा थरार नेमका कुठे रंगणार यावरुन चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. (Dipali Sayyad sayed Mahila Maharashtra Kesari Kusti spardha )

महिला महाराष्ट्र केसरीला गुरुवारपासून प्रारंभ स्पर्धा सांगलीतच होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, नेत्या दीपाली सय्यद यांनी महिला महाराष्ट्र केसरी कोल्हापुरातच होणार असल्याचा दावा केल आहे.

कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी "स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचा विचार आला. त्या वेळी कुस्तीगीर परिषदेत आपण यासाठी पुढाकार घेत स्पर्धा संयोजनाची तयारी दाखवली.

जिल्हा तालीम संघातर्फे संयोजन केले आहे. बेडग (ता. मिरज) येथे जिल्हा संघांची निवड चाचणीही पूर्ण झाली. गुरुवारी (ता. २३) खेळाडूंचे आगमन, वजन त्यानंतर दुपारी स्पर्धेला प्रारंभ होईल.

शुक्रवारी (ता. २४) महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी अंतिम लढत होणार आहे. असे सांगितले आहे. मात्र, सय्यद यांनी वेघली भूमिका मांडल्यामुळे पण कुस्तीचा थरार नेमका कुठे रंगणार ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

काय म्हणाल्या सय्यद?

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात कोल्हापुरात होणार आहे, अशी माहिती अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्पर्धेसाठी शासनाने मान्यता दिली असून, राज्य कुस्तीगीर परिषद व अस्थायी समितीच्या संयुक्त विद्यमाने तिचे आयोजन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

"गेली पासष्ट वर्षे पुरूषांच्या महाराष्ट्र केसरीचे आयोजन केले जाते; पण महिलांना न्याय मिळाला नाही. राज्य कुस्तीगीर परिषदेकडे गेले होते.

आता शासनाने महिलांच्या महाराष्ट्र केसरीला परवानगी दिली आहे. ही स्पर्धा मी मुंबई, पुणे किंवा अन्य कोणत्याही जिल्ह्यात घेऊ शकते. कोल्हापूर कुस्तीची पंढरी असल्याने येथे ही स्पर्धा व्हावी, अशी माझी इच्छा आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त ती कोल्हापुरात व्हावी, अशी कुस्तीप्रेमींची भावना आहे. यात कोणताही वाद-विवाद न करता राज्य कुस्तीगीर परिषद व भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीतर्फे एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात स्पर्धा होणार आहे."

महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश आले असून, शासनाने स्पर्धा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांचे पत्र माझ्याकडे आहे. त्यामुळे हीच स्पर्धा अधिकृत आहे.

” खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, "स्पर्धेसाठी कोल्हापूरला साजेल असे बक्षीस देण्यात येईल. त्याबाबत येत्या काही दिवसांत बैठक घेतली जाणार आहे. स्पर्धेचे दिमाखात आयोजन केले जाईल." असा विश्वास व्यक्त केला.

सर्व वजनी गटांत स्पर्धा

■ ७६ किलोवरील महिलांचा खुल्या गटात समावेश ■ ३६ जिल्हे व ९ महापालिका असा एकूण ४५ महिला संघांचा सहभाग

■ एका संघात १५ याप्रमाणे किमान ४५० खेळाडू

■ ३० पंच व इतर अधिकारी अशा सहाशे जणांच्या निवास, भोजनाची व्यवस्था

■ खेळाडूंचा प्रवास खर्चही संयोजकांतर्फे देण्यात येणार

■ विजेत्यास चांदीची गदा व वजनी गटातील विजेत्यांना बक्षीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: आरवली उड्डाणपूल मे अखेर होणार सुरु

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT