Recruitment esakal
महाराष्ट्र बातम्या

Recruitment : पात्रतेतील बदलांमुळे उमेदवार हवालदिल; राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय

सरळसेवा भरतीतील पात्रतेचे नियम बदलल्यामुळे राज्यातील उमेदवार हवालदिल झाले आहेत. ऊर्जा विभागाच्या महावितरण मधील सहाय्यक अभियंता पदासाठीचे नियम बदलण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सरळसेवा भरतीतील पात्रतेचे नियम बदलल्यामुळे राज्यातील उमेदवार हवालदिल झाले आहेत. ऊर्जा विभागाच्या महावितरण मधील सहाय्यक अभियंता पदासाठीचे नियम बदलण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या समाजसेवा अधिक्षक या पदासाठी समाजविज्ञान आणि समाजसेवा विषयातील पदव्युत्तर धारकांना अपात्र ठरविण्यात आल्याने उमेदवार आक्रमक झाले आहेत.

विद्युत अभियंत्यांसाठी महावितरण मधील सहाय्यक अभियंता पद म्हणजे ‘ड्रीम जॉब’ असतो. मात्र, त्यासाठी ऊर्जा विभागाने कोणतीही परीक्षा न घेता राष्ट्रीय स्तरावरील ‘गेट’ ही परीक्षेची अट ठेवली आहे. तसेच राज्यातील अधिवासाचा निकष काढून टाकल्यामुळे भूमिपूत्रांवर अन्याय होत आहे, अशी भूमिका उमेदवारांनी घेतली आहे.

यासंबंधी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना निवदेनही देण्यात आल्याचे उमेदवार सांगतात. महावितरण मध्ये सहाय्यक अभियंत्यांची (एई) ६०० आणि कनिष्ठ अभियंत्याची (जेई) ३०० पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. तरीही अनुक्रमे २८१ आणि ५१ एवढ्या कमी जागांची भरती काढत पात्र अन्याय केला असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली.

समाजसेवेचे उमेदवार अपात्र -

नुकतीच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांनी ‘समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय’या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर पात्र-अपात्र उमेदवार यांची यादी प्रकाशित केली. या यादी मध्ये अनेक उमेदवारांना सेवा प्रवेश नियमांनुसार पात्र असताना अपात्र दाखविल्याच आरोप उमेदवारांनी केला आहे.

मास्टर्स इन सोशल सायन्स (एमएसडब्ल्यू) किंवा मास्टर इन सोशल वर्क हा अभ्यासक्रम उत्तीर्ण असतानाही अपात्र करण्यात आले आहे. तसेच अपात्र उमेदवारांमध्ये मुक्त विद्यापीठातून एमएसडब्ल्यू आणि एमए समाजशास्त्र केलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. एकूण ८३ पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

विद्यूत अभियंत्यांच्या मागण्या -

- गेट ची सक्ती रद्द करून आयबीपीएस मार्फत भरती घ्यावी

- महाराष्ट्राच्या अधिवासाचा दाखला सक्तीचा करावा

- रिक्त पदानुसार भरती करावी

- प्रवर्गानुसार जागांचे वितरण हवे

- वयोमर्यादा तीन वर्षांनी शिथिल करावी

- शिकाऊ अभियंत्यांना १० टक्के आरक्षण मिळावे

महावितरणने अधिवासाची अट काढल्यामुळे इतर राज्यातील उमेदवारांनाही भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल. तसेच आजवर आयबीपीएस मार्फत होणारी परीक्षा रद्द करत ‘गेट’चा निकष लावल आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे.

- संदीप वडितकर, उमेदवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT