rajnish seth sakal
महाराष्ट्र बातम्या

Director General of Police : पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससी आयोगाच्या अध्यक्ष पदी वर्णी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या अध्यक्ष पदावर राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या अध्यक्ष पदावर राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृतती झाल्यानंतर हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होते.फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची राज्याचे पोलीस महासंचालपदी नियुक्ती करण्यात आली होती.

त्यानंतर, आता त्यांच्याकडे ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालक पदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.

एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तेव्हा रजनीश सेठ यांनीही अर्ज केला होता. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आलेल्या अर्जांची छाननी करून तीन नावांची यादी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठविली. त्यानंतर शासनातर्फे रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुढील पोलीस महासंचालक कोण?

रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने नवीन महासंचालक कोण होणार याचीही चर्चा रंगणार आहे. सध्या केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या रश्मी शुक्ला यांना संधी मिळू शकते. रजनीश सेठ 1988 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. या तुकडीच्या रश्मी शुक्ला या एकच अधिकारी आहेत. जून 2024 मध्ये त्या निवृत्त होतील. या निमित्ताने राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

Nagpur IPL betting raid: आयपीएल ऑनलाइन क्रिकेट सट्टा रॅकेटचा पर्दाफाश; नागपुरात छापा, चौघांना अटक, ३.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagpur cyber crime: नागपुरात ज्येष्ठ निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून २ कोटींची सायबर फसवणूक

SCROLL FOR NEXT