rashmi shukla sakal
महाराष्ट्र बातम्या

Rashmi Shukla : पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ

राज्य सरकारच्या गृह विभागाने पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. याबाबत गृह विभागाने मंगळवारी (ता. २७) आदेश काढले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्य सरकारच्या गृह विभागाने पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. याबाबत गृह विभागाने मंगळवारी (ता. २७) आदेश काढले. शुक्ला यांचा कार्यकाळ तीन जानेवारी २०२६ पर्यंत राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

राज्य सरकारने भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांची चार जानेवारी २०२४ रोजी पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली होती. त्या जून महिन्यात सेवानिवृत्त होणार होत्या. त्यांचा चार महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक होता. परंतु राज्य सरकार त्यांच्याबाबत सकारात्मक असल्यामुळे त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

अखेर शुक्ला यांना नियुक्तीपासून दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्याबाबत गृह विभागाने आदेश काढले. रश्मी शुक्ला शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांनी यापूर्वी पुणे शहर पोलिस आयुक्त पदाचीही जबाबदारी पार पाडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT