Director MSEB on employees of 3 power companies go on 72 hour strike electricity workers strike  
महाराष्ट्र बातम्या

MSEB News : वीज कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मोठी अपडेट! महावितरणचे ग्राहकांना महत्वाचे आवाहन

सकाळ डिजिटल टीम

electricity workers strike in Maharashtra : विज क्षेत्रातील खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिनही कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी ४ जानेवारी (मंगळवारी रात्री १२) पासून संपावर जाणार आहेत. यामुळे सध्या राज्य अंधारात जाणार का असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. या दरम्यान महावितरणकडून महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाचे संचालक विश्वास पाठक यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.या संपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. "राज्यातील जनतेने कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नाही. वीज कर्मचारी त्यांच्या संपाविषयीची भूमिका बदलतील याची खात्री आहे. अन्यथा पर्यायी व्यवस्था झाली असल्याने विद्युत पुरवठा अखंडित राहील याची खात्री बाळगावी." असे ट्विट त्यांनी केले आहे.

संपाची हाक का दिलीय?

सरकारकडून अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत तिनही कंपन्यांच्या कर्मचार्‍यांच्या ३१ संघटनांनी हा संप पुकारला आहे. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोण-कोण सहभागी होतंय

७२ तासांच्या या संपात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अर्थात तिन्ही कंपन्यांचे सर्व अधिकारी , अभियंते आणि कर्मचारी असे ८६ हजार कामगार अभियंते संपात सहभागी होत आहेत. तसेचविज कंपन्यांच्या कर्मचार्‍यांनी तीन दिवसीय राज्यव्यापी संपानंतरही गरज पडल्यास संप तीन दिवसांनंतरही सुरु ठेऊ अशी भूमिका घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT