युगुल  sakal
महाराष्ट्र बातम्या

युगुल नृत्य करणाऱ्या दीर्घिकांचा शोध

अद्ययावत जीएमआरटीचे संशोधन; आजवरची तीसरी घटना

सम्राट कदम

पुणे : देशातील रेडिओ खगोलशास्रज्ञांनी अत्यंत दुर्मिळ अशा जुळ्या दीर्घिकांचा शोध घेतला आहे. विशेष म्हणजे या दीर्घिका जणू युगुल नृत्य करत आहे, असा भास होतो. नारायणगाव जवळील खोडदच्या जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) सहायाने हा वैश्विक नृत्याचा देखावा टिपण्यात आला आहे.

मुंबईचे प्रा. गोपाल कृष्ण, बंगळूरचे डॉ. रवी जोशी, कोलकाताचे दुस्मंता पात्रा आणि नैनिताल अमितेश ओमर यांच्यासह आंतरराष्ट्रीय शास्रज्ञांमध्ये शांघायचे क्स. यांग, बीजिंगचे एल. सी. हो, इविंग येथील पी. जे. विटा यांचा संशोधनात सहभाग आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या मंथली नोटीस ऑफ द रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी (लेटर्स) या शोधपत्रिकेत हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. तीन दशकांच्या अथक प्रयत्नानंतर अद्ययावत जीएमआरटीच्या सहायाने शास्रज्ञांना या दुर्मिळ दीर्घिकांचा शोध लागला आहे.

शोधाची पार्श्वभूमी

विश्वातील दीर्घिकांचा एक मोठा अंश जोड्यांमध्ये किंवा लहान गटांमध्ये आढळतो. सर्व त्यांच्या परस्पर गुरुत्वाकर्षणाने एकत्र ठेवलेले असतात. शिवाय, सर्व मोठ्या आकाशगंगेच्या तारकीय केंद्रस्थानी महाकाय कृष्णविवर असल्याचे मानले जाते. ‘सक्रिय’ अवस्थेत प्रवेश केल्यावर ही कृष्णविवर प्लाझ्माचे दोन विरुद्ध संयोगित ‘जेट्स’ बाहेर टाकतात. हे जेट्स मूळ आकाशगंगेपासून विरुद्ध बाजूने लाखो प्रकाशवर्षां पर्यंत वाढतात. सर्वप्रथम १९८५ मध्ये अमेरिकी रेडिओ खगोलशास्त्रज्ञांनी जुळी रेडिओ दीर्घिका शोधली, तर दुसऱ्या जुळ्या रेडिओ दीर्घिकेचा शोध युरोपिअन आणि अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी १९९१ मध्ये लावला. आज तीन दशकांच्या प्रदीर्घ अवकाशानंतर अतिशय दुर्मिळ अशा तिसऱ्या जुळ्या रेडिओ दीर्घिकेचा शोध लागला आहे.

जुळ्या दीर्घिकेची वैशिष्ट्ये ः

‘‘जे १०४४५४+३५४०५५’’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दीर्घिका लंबवर्तुळाकार असून, स्वतःच्या गुरूत्वमध्याभोवती फिरतात. हे करत असताना ते शक्तीशाली प्लाझ्मा जेट्स बाहेर सोडत आहे. त्यांच्या हालचालींमुळे युगुल नृत्याचा भास होत असून, हे रेडिओ जेट किमान १.५ दशलक्ष प्रकाश-वर्षांपर्यंत पसरलेले दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT