Congress on Sharad Pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : पवारांच्या निवृत्तीमुळे नाराज दोन जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, कार्यकर्ते सामूहिक राजिनाम्याच्या पावित्र्यात

संतोष कानडे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा केली. यानंतर नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी एक समितीही गठीत करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच या समितीमध्ये कोण सदस्य असतील याची संभाव्य नावंही त्यांनी आपल्या भाषणातच जाहीर केली.

शरद पवारांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी टाहो फोडला आहे. निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती कार्यकर्ते करीत आहेत. दरम्यान पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनीही आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर राज्यभर राजीनामा मोहीम सुरु होण्याची शक्यता आहे.

शरद पवारांनी सुचवलेल्या समितीतील संभाव्य नावं

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन या संभाव्य लोकांचा समावेश करण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवारांच्या निर्णयाला सर्वांनी नकार दर्शवला असून तुमचा हा निर्णय आम्हाला नामंजूर आहे अशी घोषणा माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. त्याचबरोबर या निर्णयानंतर छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले होते. त्याचबरोबर सभागृहात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनासुद्धा अश्रू अनावर झाले होते.

बुलढाणा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांनी राजीनामा देत जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी सामुहिक राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शरदचंद्र पवार यांच्या निर्णय देशपातळीवर नाही तर जग पातळीवर धक्का देणारा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी व नागरिकांसाठी हा धक्का देणार तसेच क्लेशदायक घटना आहे.राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी फेरविचार करून निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात येत आहे.

ॲड.नाझेर काझी यांनी पुढे म्हणाले की,प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सादर केला आहे. माजी मंत्री तथा आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा तसेच सर्व पदाचे राजीनामे सादर करणार असल्यांचे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! उच्चांकापासून ₹31,000 स्वस्त; दसऱ्याआधी किती रुपयांना विकलं जातंय सोनं?

IND vs WI 1st T20I: वैभव सूर्यवंशीला आज संधी मिळणार का? भारतीय प्रशिक्षकाने दिले महत्त्वाचे अडेट्स; म्हणाला...

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: महायुतीत बंडखोरीचे सत्र सुरूच; शेखर भोयर यांच्यानंतर भाजपच्या डॉ. संगीता शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT