महाराष्ट्र बातम्या

Nitesh Rane : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नितेश राणे यांचीही होणार चौकशी; नागपूर अधिवेशनात केली होती 'ही' मागणी?

दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार असून दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा दावा राणे यांनी केला होता. याची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी नागपूर अधिवेशनात त्यांनी केली होती.

संतोष कानडे

Disha Salian Death Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी भाजप नेते, आमदार नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या एसआयटीमार्फत सुरु आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार असून दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा दावा राणे यांनी केला होता. याची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी नागपूर अधिवेशनात त्यांनी केली होती.

सालियन हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचाही दावा नितेश राणे यांनी केला होता. त्यामुळेच मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आलेली आहे.

दुसरीकडे नितेश राणे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना आपल्याकडे दिशा सालियन प्रकरणात पुरावे असल्याचं म्हटलं आहे. राणे म्हणाले की, त्या हिंदू मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाला.. सगळी माहिती माझ्याकडे आहे. सीसीटिव्ही फुटेज, रजिस्टरचे कागद फाडण्यात आले आहे.

राणे पुढे म्हणाले की, मी पोलिसांना सगळी माहिती देण्यासाठी तयार आहे. यापूर्वी देखील मला आणि नारायण राणे यांना बोलावण्यात आले होते. पण तेव्हा पोलिसांवर दबाव होता. मी मुंबई पोलीस आणि SIT समोर सगळे पुरावे देणार आहे.

काय आहे दिशा सालियन मृत्यू प्रकरण?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा 14 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या पाच दिवस आधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मालाडमधील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरुन पडून दिशाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा संबंध असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश सरकारने दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 52 अंकांच्या वाढीसह बंद; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जबरदस्त वाढ

ठरलं! स्टार प्रवाहवरील आणखी एक कार्यक्रम घेणार निरोप; त्याजागी दिसणार 'हा' शो; प्रोमो व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील वाघोली येथील भंगार दुकानाला भीषण आग

Solapur News: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 17 गावांच्या आरक्षणात बदल

Railway Jobs 2025: रेल्वे मध्ये १० वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती सुरु; प्रशिक्षणादरम्यान मिळेल आकर्षक मासिक वेतन!

SCROLL FOR NEXT