Jari Narke_Sameer Wankhede 
महाराष्ट्र बातम्या

समीर वानखेडेंना सरकारी नोकरीतून बडतर्फ करा - हरी नरके

खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा दावा

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामुळे चर्चेत आलेले केंद्रीय नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे हे वेगळ्याच कारणानं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्याविरोधात काही पुरावे समोर मांडल्याने त्यावर आता राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यावर सामाजिक विषयांचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी थेट भाष्य केलं असून वानखेडे यांच्या बडतर्फीची मागणी केली आहे.

समीर वानखेडे कुठल्या कारणामुळं आलेत अडचणीत?

समीर वानखेडे हिंदू आहेत की मुस्लिम हा वाद सुरु झाला आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांचे वडील हे हिंदू तर आई मुस्लीम असल्याचं त्यांनी स्वतः म्हटलं आहे. पण त्यांचा पहिला विवाह हा मुस्लिम पद्धतीन मुस्लीम धर्मिय डॉ. शबाना यांच्याशी झाला होता. तसेच समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नावही निकाहाच्या कागदपत्रांवर दाऊद वानखेडे असल्याची नोंद आहे. याला समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणाऱ्या मौलवींनीही दुजोरा दिला आहे. ही सर्व कागदपत्रे नवाब मलिक यांनी जाहीर केली आहेत. यावरुन समीर वानखेडे यांनी मुस्लीम असतानाही हिंदू मागासवर्गीय असल्याच्या बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे युपीएसची परीक्षा उत्तीर्ण करत सरकारी नोकरीचा फायदा मिळवल्याचा आरोप केला आहे.

हरी नरकेंचं म्हणणं काय?

प्रा. हरी नरके यांनी समीर आणि डॉ. शबाना यांचा निकाह ज्या मौलवींनी लावला त्यांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये समीर वानखेडेंचा निकाह मुसलमान असल्याचे सांगून झाला, असे निकाह लावणारे मौलवी सांगत आहेत. "निकाहवेळी समीर वानखेडे यांनी आपल्या वडिलांचे नाव दाऊद असे सांगितले, तसेच स्वतः मुस्लिम असल्याचे लिहून सही केली" मौलवींच्या या स्पष्टीकरणावरुन "खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे मिळवलेल्या राखीव जागेच्या सरकारी नोकरीतून समीर वानखेडे यांना डिसमिस करा", अशी मागणी प्रा. हरी नरके यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT