Sachin waze Jayant patil  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sachin waze: जयंत पाटील अडकणार? सचिन वाझेंनी नाव घेतल्यामुळे नवा ट्विस्ट; फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात काय?

Sachin waze allegation on Jayant patil: अँटेलिया, मनसुख हिरेन आणि १०० कोटी प्रकरणातील आरोपी सचिन वाझेच्या आरोपांमुळे राजकारणात भूकंप येणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अँटेलिया, मनसुख हिरेन आणि १०० कोटी प्रकरणातील आरोपी सचिन वाझेच्या आरोपांमुळे राजकारणात भूकंप येणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. सचिन वाझे यांनी माजी मृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्याच बरोबर त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देखील नाव घेतले आहे.

अनिल देशमुख यांच्यानंतर वाझेंनी जयंत पाटील यांच्यावर बोट केले आहे. काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. समित कदम नावाचा व्यक्ती त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांची ऑफर घेऊन यायचा असा आरोप देशमुखांनी केला होता. १० दिवसातच या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सदर प्रकरणात समित कदम नंतर जयंत पाटील यांचे नव्याने चर्चेत आले आहे.

सचिन वाझे यांनी एएनआयला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. वाझेंनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी सांगितलंय की, अनिल देशमुख हे आपल्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. वाझेंनी जयंत पाटील यांचे नाव देखील पत्रात असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे. वाझे यांनी जयंत पाटील यांच्यावर नेमके काय आरोप केलेत हे पत्र बाहेर आल्यानंतरच समजू शकेल. पण, यामुळे राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यात सचिन वाझे यांनी जयंत पाटील यांच्यावर आरोपाचा ठपका ठेवल्याने नवा वाद समोर आला आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना वाझे यांनी बड्या नेत्याचे नाव घेतले असल्याने राजकीय वातावरण तापणार आहे. शरद पवार गटाला अडचणीत आणण्याचा हा डाव आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. जयंत पाटील यांच्यावर नेमके काय आरोप करण्यात आलेत हे पत्र समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT