Displeasure The Police State As They Will Not Get Diwali Bonus  esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Police : मुंबई पोलिसांना ना बोनस ना अ‍ॅडव्हान्स

सकाळ डिजिटल टीम

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी त्यांना मिळणाऱ्या बोनसमुळे आनंदात जात असली तरी त्याला पोलीस विभाग अपवाद आहे. करोना काळात जीव धोक्यात घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या राज्यातील पोलिसांमध्ये पोलीस बोनस तसेच अॅडव्हान्स न दिल्यामुळे नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. (Displeasure The Police State As They Will Not Get Diwali Bonus )

प्रवासी आणि गणवेश भत्ताही मिळालेला नाही. मागच्या दिवाळीमध्ये केवळ सातशे पन्नास रुपयांची कुपन देऊन तोंडाला पाने पुसली होती. त्यामुळे यंदाची दिवाळी तर गोड होईल अशी आशा वाटत होती मात्र, दिवाळी तोंडावर येऊनही अ‍ॅडव्हान्स पगार नाही. कोरोनाकाळी पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस देण्यात आला होता. तेव्हाही पोलिसांची दमछाक झाली मात्र पोलिसांनी काही मिळाले नव्हते. मुंबईत २४तास काम करणाऱ्या पोलिसांची अशी हेटाळणी का करतायत अशी विचारणा पोलिस दलाकडून करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आर.आर. चव्हाण या पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून पोलिसांना एक महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्याची मागणी केली आहे. हे पत्र मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री कार्यालय, अर्थमंत्री कार्यालय आणि राज्याचे पोलीस महासंचालक कार्यालय अशा विविध कार्यालयांना पाठवण्यात आले आहे.

अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस मिळणार नसल्यामुळे समाजमाध्यमांवर खदखद व्यक्त केली. पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांनी दिवाळी बोनस देण्यासाठी सकारात्मकता दर्शवावी. असे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Manchar Accident : मंचरजवळ एकलहरे येथे भीषण अपघात! पिंपरी-चिंचवडचे वास्तुविशारद आंबेगावे पती-पत्नी व सासूचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : जळगावच्या पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषणाचा तिसरा दिवस

ग्राहक पैसे पूर्ण देतात, तर वापर न झालेला डेटा मध्यरात्रीच का रिसेट करता? टेलिकॉम कंपन्यांना राघव चड्ढांचा प्रश्न, ही डिजीटल लूट

SCROLL FOR NEXT