caste validity and caste certificate esakal
महाराष्ट्र बातम्या

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतील वाद! सोलापूर समितीच्या तत्कालीन अध्यक्षांचे ६ जणांवर गंभीर आरोप; पोलिसांना दिल्या ४२ ऑडिओ क्लिप, १००० पानांचे झेरॉक्स, वाचा...

सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या तत्कालीन अध्यक्षा मंजूषा मिस्कर यांनी ९ जून रोजी सदर बझार पोलिसांत सहा जणांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आता ४२ ऑडिओ क्लिप व एक हजार पानांच्या फाइल (झेरॉक्स) सादर केल्या आहेत. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या तत्कालीन अध्यक्षा मंजूषा मिस्कर यांनी ९ जून रोजी सदर बझार पोलिसांत सहा जणांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आता ४२ ऑडिओ क्लिप व एक हजार पानांच्या फाइल (झेरॉक्स) सादर केल्या आहेत. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. मात्र, मिस्कर यांनी दिलेले ऑडिओ व कागदपत्रे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर या वादाचा उल्लेख केल्याने मिस्कर यांची फिर्याद पुन्हा चर्चेत आली आहे.

सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा म्हणून २८ मार्च रोजी मंजूषा मिस्कर यांनी पदभार स्वीकारला होता. तत्पूर्वी, १५ मार्च रोजी सदस्य म्हणून उपायुक्त रविंद्र कदम पाटील रुजू झाले होते. त्यानंतर काही दिवसांत दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये कार्यालयीन कामकाजावरून वादविवाद सुरू झाले. २७ मार्च ते २७ ऑगस्ट २०२५ या काळात कदम पाटील यांच्यासह अन्य पाच जणांनी शासकीय कामकाजात अडथळा केला. वारंवार बजावूनदेखील त्यांनी संगनमत करून आदेशाचे पालन केले नाही. प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण करणे, वरिष्ठांच्या मान्यतेनंतरही ऑनलाइन प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब करणे, जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रकरणे प्रलंबित ठेवणे, आदेशाचे पालन न करणे, असे प्रकार त्यांनी केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यांनी अश्लील व लिंगभेदी वक्तव्ये करून मानसिक त्रास दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

तत्पूर्वी, कदम पाटील यांनी कार्यालयातील १४ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ‘बार्टी’ व समाज कल्याण आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर मिस्कर यांनीही ‘बार्टी’ला अहवाल दिला होता. यानंतर कदम पाटील यांच्यावर सांगलीच्या समितीच्या अहवालानुसार २४ एप्रिल २०२५ रोजी निलंबनाची कारवाईदेखील झाली. त्यानंतर त्यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली. तसेच कोल्हापूर सर्किट बेंचमध्येही फिर्याद रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, ६ ऑगस्ट रोजी न्यायालयाने पोलिसांनी तपास सुरू ठेवावा; मात्र पुढील आदेशापर्यंत दोषारोपपत्र दाखल करू नये, असा आदेश दिल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले.

‘महिलेच्या हाताखाली काम करण्याची वेळ’

कार्यालयात समितीच्या अध्यक्षा मंजूषा मिस्कर व सदस्य रवींद्र कदम पाटील हे होते. त्यावेळी शासकीय कामकाजाच्या अनुषंगाने सदस्य अधिकाऱ्यास सूचना करत असताना, ‘आता महिला अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली’, असे कदम पाटील म्हणाल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. या प्रकरणात ९ जून रोजी सहा जणांविरुद्ध (कदम पाटील, शिवलकर, गायकवाड, लगदिवे, कटारे, दुरूगकर) गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सोमवारी (ता. २४ ऑगस्ट) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूरच्या जात पडताळणी समितीतील दोन अधिकाऱ्यांच्या वादाचा विषय माध्यमांसमोर काढला आणि राज्यभर चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT