Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: 'त्या' आमदारकीवरुन राष्ट्रवादीत धुसफूस; नुकताच पक्षप्रवेश केलेल्या नेत्याविरोधात ठोकला शड्डु

आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांना चारीमुंड्या चित करू

अंकिता खाणे (Ankita Khane)

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मी भविष्यात कारखाना सोडून कुठलीही निवडणूक लढविणार नाही, असे सांगून, सत्ता मिळविणाऱ्या अभिजित पाटील यांना केवळ दोनच महिन्यात आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहे. जनतेच्या आशीर्वादाने त्यांना चारीमुंड्या चित करू, असा विश्वास भगीरथ भालके यांनी व्यक्त केला.(Latest Marathi News)

भालके पुढे म्हणाले, अर्थकारणातून सत्ता मिळविण्याचा नवा पायंडा पाडण्याचा काहीजणांकडून प्रयत्न होत आहे.

युवराज पाटील म्हणाले, विठ्ठलच्या निवडणुकीत आमच्यामध्ये राजकीय मतभेद होते, मात्र मनभेद नव्हते. ते आता आम्ही बाजूला सारून सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या निवडणुकीत कल्याणराव काळे यांच्यासोबत राहणार आहोत. कारखानदारीत चांगल्या प्रवृत्तीची माणसे यावीत म्हणून आम्ही कल्याणराव काळे यांना साथ देण्याचे ठरविले आहे. कै. औदुंबरअण्णांची शिकवण असल्यामुळे गद्दारी आम्ही केली नाही व करणार नाही.(Marathi Tajya Batmya)

आम्ही कल्याणराव काळे यांच्या बरोबर येत असताना कोणतेही आश्वासन, पद, शब्द याची अपेक्षा न करता खुल्या मनाने साथ देणार आहोत. सभासदांसाठी कारखाना चांगला चालला पाहिजे. आम्ही कै. वसंतदादा काळे, कै. भारतनाना भालके यांच्या विचाराने चालणारे वारस आहोत. आम्ही विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही.(Latest Maharashtra News)

गणेश पाटील म्हणाले, विठ्ठलच्या निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊन चुकीच्या प्रवृत्तीची माणसे तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होऊ नये यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांच्या निवडणुकांत अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून संधी मिळणार आहे. आगामी सहकार शिरोमणी निवडणुकीसाठी तालुक्यातून चांगल्या प्रकारे मतदान करून ही एकी सभासदांनी दाखवून देणे गरजेचे आहे.

राजकीय परिस्थिती बदलत चालली आहे. ही निवडणूक सर्वसामान्यांच्या प्रपंचाशी निगडित आहे. (Latest Maharashtra News)

२० वर्षे कारखाना चांगला चालला आहे. परंतु दोन वर्षात दुष्काळ परिस्थिती, आर्थिक अडचणी व मानवनिर्मित अडचणी आल्यामुळे बिले देण्यास विलंब लागला आहे. तरीही कल्याणराव काळे यांनी अडचणीतून मार्ग काढत कारखाना चालू ठेवला, त्यामुळे सभासदांनी या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहिले पाहिजे.(Latest Marathi News)

स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपापसांतील मतभेद मिटविले पाहिजेत. यासाठी सभासदांनी जागरूक राहून सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कल्याणराव काळे यांना मतदान करून साथ द्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

यावेळी ‘विठ्ठल’चे संचालक समाधान काळे, शेतकरी संघटनेचे समाधान फाटे, भारत बागल, सुधाकर कवडे यांचीही भाषणे झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT