sanitizer Media Gallery
महाराष्ट्र बातम्या

डिस्टिलरींना हॅंड सॅनिटायझर उत्पादनास मुदतवाढ ! निर्यातीसही मिळाली परवानगी

डिस्टिलरींना हॅंड सॅनिटायझर उत्पादनास मुदतवाढ मिळाली असून निर्यातीसही परवानगी दिली आहे

प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : केंद्र सरकारने (Central Ministry) डिस्टिलरी व इतर सॅनिटायझर उत्पादकांना (Distillery and sanitizer manufacturers) 31 डिसेंबर 2021 पर्यंत सॅनिटायझर उत्पादनास मुदतवाढ दिली आहे. त्याबाबत केंद्राने राज्यांना पत्र पाठवून आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. या निर्णयामुळे हॅंड सॅनिटायझर (Hand Sanitizer) उत्पादनाची प्रतिदिन क्षमता 30 लाख लिटरपर्यंत वाढून 4.2 कोटी लिटर सॅनिटायझर निर्मिती होईल. (Distillers have been given an extension to produce hand sanitizers and are also allowed to export.)

हॅंड सॅनिटायझर निर्यातीस देखील परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भारतातून इतर देशांना सॅनिटायझर निर्यात करण्यात येत आहे. डिस्टिलरीज व अन्य सॅनिटायझर उत्पादकांना आणखी एक वर्ष म्हणजे 31 डिसेंबर 2021 पर्यंत सॅनिटायझर उत्पादन करण्यास योग्य ती परवानगी देण्याची सूचना केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने राज्य सरकारांना केली आहे.

केंद्राने गतवर्षी डिस्टिलरीज व अन्य सॅनिटायझर उत्पादकांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत उत्पादनास मंजुरी दिली होती. त्या वेळी बहुतांश राज्यांनी प्रतिसाद देत राज्यातील डिस्टिलरींना सॅनिटायझर निर्मितीसाठी परवाने (लायसन्स) दिले होते. त्यामुळे सॅनिटायझर उत्पादनात मोठी वाढ झाली होती, असे केंद्राच्या साखर व प्रशासन सहसचिवांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

तसेच कोव्हिडचा संसर्ग लगेच थांबणारा नसून त्याच्या विरोधात लढण्यास हॅंड सॅनिटायझरची भूमिका यापुढेही कायमच राहणार आहे. राज्यातील डिस्टिलरीज व अन्य सॅनिटायझर उत्पादकांना आवश्‍यक ती परवानगी देण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील औषध नियंत्रकांना सूचना देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात योग्य किमतीत व पुरेशा प्रमाणात सॅनिटायझरची उपलब्धता होईल, असा विश्वास केंद्राला वाटतो.

कोरोना महामारीच्या भयंकर लाटेमध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशा अत्यंत कमी किमतीत व गुणवत्तापूर्ण सॅनिटायझर देण्याचे धोरण सर्वच साखर कारखान्यांनी ठरविले आहे. केंद्राने त्याच्या निर्मितीस मुदतवाढ दिल्याने सर्वच कारखाने सर्वसामान्यांना माफक दरात सॅनिटायझर देऊ शकतील.

- बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT