sakal exclusive sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर शहरातील विदारक स्थिती! नागरिकांना ५ ते ६ दिवसाआड पाणी अन्‌ पाणी भरण्यासाठी १.५० लाख नळाला विद्युत मोटारी लावून पाणी उपसा

सोलापूरकरांना नियमित सोडा, एक-दोन दिवसांआड सुद्धा पाणी मिळत नाही. काही भागात पाच तर काही ठिकाणी सहा दिवसांआड पाणी येते. त्यामुळे पुढचे पाणी येईपर्यंत सध्याचे पाणी पुरवायला पाहिजे म्हणून नळाला विद्युत पंप लावण्याचा प्रकार सोलापूर शहरात सुरू आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरात अडीच लाख नळ कनेक्शनधारक आहेत. त्यापैकी तब्बल दीड लाखांहून अधिक लोक पाणी भरण्यासाठी विद्युतपंप (मोटारी) लावतात, अशी माहिती खुद्द महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच दिली. सोलापूरकरांना नियमित सोडा, एक-दोन दिवसांआड सुद्धा पाणी मिळत नाही. काही भागात पाच तर काही ठिकाणी सहा दिवसांआड पाणी येते. त्यामुळे पुढचे पाणी येईपर्यंत सध्याचे पाणी पुरवायला पाहिजे म्हणून नळाला विद्युत पंप लावण्याचा प्रकार सोलापूर शहरात सुरू आहे.

मागच्या २० ते २५ वर्षांपासून महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत नियमित पाण्याचे आश्वासन सत्ताधारी व विरोधी पक्षातील मंत्री, आमदारांसह स्थानिक नगरसेवकांनी दिले. पण प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झाली नाही. अनेक भागात कमी इंची जलवाहिनी असल्याने शेवटच्या टोकाला अपेक्षित दाबाने पाणी पोचत नाही. त्यामुळे देखील विद्युत मोटारी लावल्या जातात तर अपार्टमेंट, बंगल्यांमधील लोक वरच्या मजल्यावर पाणी चढत नाही म्हणून मोटारी लावून पाणी उपसतात.

घरातील विजेच्या बोर्डात वायर खुपसून विद्युत मोटार लावली जाते. पाणी भरताना सगळीकडे पाण्यामुळे ओले झालेले असते. अनेकदा त्या मोटारीच्या वायरीला जोड दिलेली असते. त्यावर पाय पडून गतवर्षी तिघांना जीव गमवावा लागला आहे. हा जीवघेणा खेळ मागच्या १५ ते २० वर्षांपासून सुरूच आहे. नियमित किंवा एक-दोन दिवसांआड तरी पाणी मिळाले तर हा गंभीर प्रकार कायमचा थांबू शकतो. त्यासाठी लोकप्रतिनिधी सरकारदरबारी किती पाठपुरावा करतात, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

८५ टक्के नळ कनेक्शनला वापरतात विद्युत मोटारी

दररोज प्रतिमाणसी १३५ लिटर पाणी देणे अपेक्षित आहे. पण, सध्या चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने प्रत्येकवेळी तेवढ्या प्रमाणात पाणी दिले जाते. तरीदेखील, ८० ते ८५ टक्के नळ कनेक्शनधारक विद्युत मोटार लावून पाणी उपसतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यावर प्रत्येक कनेक्शनला मीटर लावणे हाच त्यावरील कायमचा उपाय आहे.

- व्यंकटेश चौबे, अभियंता, सार्वजनिक आरोग्य, सोलापूर महापालिका

शहरातील पाणीपुरवठ्याची स्थिती

  • एकूण नळ कनेक्शनधारक

  • २.४९ लाख

  • विद्युत मोटारी लावणारे

  • १.५० लाखांहून अधिक

  • पाणीपुरवठा

  • ५ ते ६ दिवसांआड

  • शॉक लागून सरासरी मृत्यू

  • दरवर्षी २ ते ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

प्रवीण तरडेंचा ‘थिएटर व्हिजिट’ पॅटर्न आता बॉलिवूडमध्ये हिट! बॉलिवूडने स्वीकारला ‘तरडे फॉर्म्युला’

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT