maratha quota protest turns violent in jalna maharashtra police injured lathicharge Sakal
महाराष्ट्र बातम्या

जालन्यात जमावबंदी ! जाळपोळीच्या घटना वाढल्याने जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

जालना परिसरातील जाळपोळीच्या घटना आणि हिंसक गोष्टी वाढल्याने प्रशासाने जालना जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

Manoj Bhalerao

Jalna Lathicharge:जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जमध्ये आंदोलक मोठ्या प्रमाणात जखमी झाले. त्यानंतर आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये जवळपास ६३ पोलीस जखमी झाले.

या घटनेमुळे महाराष्ट्रभरात वातावरण तापलं. जाळपोळीच्या घटनांमध्ये वाढ झाली. मराठा आंदोलकांकडून आगारात उभ्या असणाऱ्या बस जाळण्यात आल्या. जालना परिसरातील जाळपोळीच्या घटना आणि हिंसक गोष्टी वाढल्याने प्रशासाने जालना जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी जालन्यात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. उद्यापासून १७ सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी राहणार आहे. जालना जिल्हातील अंतरवली सराटा या ठिकाणी समन्वयक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होते.

उपोषण करताना मनोज जरांगे यांची तब्यत बिघडली. मात्र, त्यांना उपचारासाठी नेताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला होता. लाठीचार्जच्या घटनेनंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले. (Latest Marathi News)

ही घटना आजूबाजूच्या परिसरात समजताच लोकांनी आक्रमकता दाखवत, रस्त्यावर दगडफेक केली. त्यानंतर धुळे-सोलापूर महामार्गावर एक बस आंदोलकांकडून जाळण्यात आली. शहागड बस आगारात उभ्या असणाऱ्या ४ बसेस मराठा आंदोलकांकडून पेटवून देण्यात आल्या. त्यानंतर राज्यभरात जाळपोळीच्या घटना वाढल्या. या घटनेचे तीव्र प्रतिसाद राज्यात उमटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT