st bus employee sakal media
महाराष्ट्र बातम्या

ST Employee Bonus: एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! दिवाळी बोनस जाहीर

एसटी कर्मचाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं त्यांना हा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनानं दिवाळी बोनस जाहीर केला आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना २,५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५,००० रुपये बोनस मिळणार आहे. या खर्चापोटी एसटी महामंडळाकडे राज्य शासनाकडून ४५ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

रखडलेल्या पगार-भत्यांसाठी ३०० कोटींच्या निधीला मान्यता

एसटी महामंडळाचं रखडलेले पगार, विविध सवलत मूल्य आणि रखडलेल्या भत्त्यांसाठी राज्य सरकारनं नुकतीच ३०० कोटींच्या निधीला नव्याने मान्यता दिली. गेल्या काही दिवसांमध्ये फडणवीस-शिंदे सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना मासिक वेतनासाठी ठोस मदत होत नसल्याची टीका होत होती, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी २०२२-२३ मध्ये सरकारने विविध सवलत मूल्यांपोटी १३८८.५० कोटी शिल्लक तरतुदीमधून ३०० कोटींना ही मान्यता दिली. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार असं सांगितलं जात होतं.

दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांमध्ये होता असंतोष

राज्यात ७ सप्टेंबरला फक्त आगार स्तरावरील एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झाले होते. तर विभागीय आणि मध्यवर्ती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी पगारापासून वंचित होते. पगाराची तारीखेचे ५ दिवस उलटूनही पगार मिळत नसल्यानं एसटी कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये पगारावरून संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली होती. त्यानंतर सरकारनं आज रात्री उशिरापर्यंत एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार, बोनस, विविध देणी आणि भत्त्यांचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी ३०० कोटींच्या निधीला मान्यता दिल्यानं कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC News : कामचुकार अधिकाऱ्यांना घरी बसविणार : आयुक्त नवलकिशोर राम

BCCI अफगाणिस्तानसोबत! पाकिस्तानच्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या तिन्ही क्रिकेटपटूंबद्दल व्यक्त केला शोक

Pune City: पुण्यातली दुरवस्था बघून आयुक्त संतापले; सहाय्यक आयुक्तांची केली उचलबांगडी, तिघांचं निलंबन

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये निवडणुकीआधी 'I.N.D.I.A' आघाडीला मोठा झटका!, आता ‘या’ मित्रपक्षाचाही स्वबळाचा नारा

Latest Marathi News Live Update : वसई, विरार शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन फुटली

SCROLL FOR NEXT