schools diwali holydays

 
sakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थ्यांना उद्यापासून दिवाळी सुट्ट्या! झेडपी शाळांना २७ ऑक्टोबरपर्यंत तर माध्यमिक शाळांना २ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी; विद्यापीठाची परीक्षा २८ ऑक्टोबरपासून

यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा गुरुवारी संपणार आहे. त्यानंतर १७ ते २७ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा परिषदांच्या शाळांना सुट्टी असणार आहे. तर माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टी १७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा गुरुवारी संपणार आहे. त्यानंतर १७ ते २७ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा परिषदांच्या शाळांना सुट्टी असणार आहे. तर माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टी १७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

दरवर्षी शाळांना शैक्षणिक वर्षातील ५२ रविवार वगळून ७६ सार्वजनिक सुट्ट्या असतात. त्यात दिवाळी, उन्हाळा सुट्ट्यांचाही समावेश असतो. यंदा शाळांना १७ ऑक्टोबरपासून दिवाळी सुट्ट्या लागणार आहेत. पण, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, इंग्रजी माध्यमांच्या खासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या सुट्ट्यांचे दिवस वेगवेगळे आहेत. पण, १४ ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत इयत्ता सहावी ते बारावीच्या वर्गांवरील शिक्षकांना ‘विकसित भारत’ उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे लागणार आहे.

दिवाळी सुट्ट्यांमध्ये सुद्धा ऑनलाइन पद्धतीने त्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात शिक्षकांना राहावे लागणार आहे. दरम्यान, दिवाळी सुट्ट्यानंतर २८ ऑक्टोबरपासून जिल्हा परिषदेच्या शाळा नियमित सुरु होतील. माध्यमिक शाळा ३ नोव्हेंबरपासून भरणार आहेत.

माध्यमिक शाळा ३ नोव्हेंबरपासून

जिल्हा परिषदांच्या शाळा व खासगी माध्यमिक शाळांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांना १७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्ट्या असतील. २ नोव्हेंबरला रविवार असल्याने ३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होतील.

- तानाजी माने, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ

२८ ऑक्टोबरपासून विद्यापीठाची परीक्षा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा २८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मागच्या परीक्षेत विषय राहिलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची ४ नोव्हेंबरपासून परीक्षा सुरू होईल. तर १३ नोव्हेंबरपासून अभियांत्रिकीच्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होणार आहे. कुलगुरू, प्र कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबरअखेर सर्व विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होतील. पाच ते आठ दिवसांत निकाल जाहीर करण्याचे नियोजन केल्याचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: 'मी तुम्हाला बोलावलंच नाहीये...' जेव्हा जसप्रीत बुमराहची सटकते; विमानतळाबाहेर रिपोर्टर्सवर भडकला

Pune : लालपरीची काय ही अवस्था? दरवाजाच नाही, तरी प्रवाशांच्या सेवेत; जीव धोक्यात घालून प्रवास

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्थानक परिसरात शिवसेनेचा मोर्चा

Solapur: ७६ वर्षांनंतर सीनानदी धोक्याच्या पातळीवर; १९४९ नंतरचा सर्वात मोठा पूर, पातळी ४३०.६ मीटरवर

'तिला थंडी ताप आला त्याचं वेळी जर...' आईच्या आठवणीत तेजस्विनीला भावूक होऊन म्हणाली...'आयुष्याचा काही नेम नाही..'

SCROLL FOR NEXT