zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

शाळांना १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी! विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा सुरू; २८ ऑक्टोबरपासून पुन्हा भरतील शाळा, यंदा उन्हाळा सुट्टी ‘इतके’ दिवस

दिवाळीपूर्वीच्या सत्र परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडतील. त्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्ट्या लागतील. १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी असणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : दिवाळीपूर्वीच्या सत्र परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहेत. काही शाळांच्या परीक्षा सुरूही झाल्या आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडतील. त्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्ट्या लागतील. १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी असणार आहे.

शैक्षणिक वर्षात ५२ रविवारी शाळांना सुट्टी असते. याशिवाय शाळांना सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने अशा ७६ सार्वजनिक सुट्ट्यादेखील असतात. शैक्षणिक वर्षातील राहिलेल्या २३७ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन होते. दरम्यान, यंदा जिल्हा परिषदेसह महापालिका, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना १२ दिवस दिवाळी सुट्टी असणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी २ मे ते १३ जूनपर्यंत शाळांना उन्हाळा सुट्ट्या असतील. तत्पूर्वी, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्वितीय सत्र परीक्षा सुरू होतील.

दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा उरकल्या जायच्या आणि विद्यार्थ्यांना एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच सुट्ट्या लागायच्या. म्हणजेच परीक्षा संपल्याने विद्यार्थी शाळेत येत नसत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने त्यात बदल करून सर्व शाळांची द्वितीय सत्र परीक्षा एकाचवेळी सुरू होईल, असे आदेश काढले. जेणेकरून शैक्षणिक वर्षातील किमान २२० दिवस तरी विद्यार्थ्यांचे अध्यापन व्हावे हा त्यामागील हेतू आहे.

२८ ऑक्टोबरपासून सुरू होतील शाळा

दिवाळीपूर्वीची प्रथम सत्र परीक्षा आजपासून (ता. १०) सुरू होईल. १५ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा संपतील. त्यानंतर १६ ऑक्टोबरपासून शाळांना तथा विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्ट्या लागतील. २८ ऑक्टोबरपासून पुन्हा शाळा सुरू होतील.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

दिवाळीनंतर शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी

दिवाळीनंतर नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत सोलापूरसह राज्यभरातील जिल्हा परिषदांसह पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. त्यासाठी मनुष्यबळ खूप लागणार आहे. त्यामुळे दोन्ही टप्प्यात शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump यांचे Nobel चे स्वप्न धुळीस मिळाले; व्हाईट हाऊसचा संताप उफाळला, पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...

Thane News: बेतवडेत परवडणारी घरे! महापालिकाच देणार आता विकसकाला पैसे

Gold Rates: खुशखबर! सोनं 2600 रुपयांनी तर चांदी 4000 रुपयांनी स्वस्त; आजचे भाव काय?

Rasgulla purity test : पांढराशुभ्र दिसणारा रसगुल्ला शुद्ध की भेसळयुक्त चटकन कसं ओळखाल?

Thane News: दिवाळीनिमित्त ठाण्यात वाहतुकीत बदल, काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT