Do not support Rafael : Sharad Pawar
Do not support Rafael : Sharad Pawar 
महाराष्ट्र

राफेलबाबत समर्थन नाही : शरद पवार

सकाळवृत्तसेवा

बीड : राफेलमधून देशाची लुट झाली आहे. सरकारने 650 कोटी रुपयांचे विमान 1650 कोटी रुपयांना कसे खरेदी केले याचे स्पष्टीकरण द्यावे. चौकशी समितीला सामोरे जाऊन खरेदीची कागदपत्रे सादर करावीत, संसदेत उत्तर द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयी संकल्प मेळावा सोमवारी (ता. 1) झाला. मेळाव्यात पवार यांनी राफेल खरेदी, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, दहशतवाद, आरक्षण, बेरोजगारी, भाववाढ, शेती आदी विविध मुद्द्यांवर केंद्र आणि राज्य सरकारवर सडाडून टिका केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, बाबासाहेब पाटील, सतीश चव्हाण, विक्रम काळे, रामराव वडकुते, शिवाजीराव पंडित, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, संरक्षणाच्या दृष्टीने तांत्रिक माहिती गुप्त ठेवावी, किंमती सांगायला हरकत काय. सत्ता मागताना 'आमचा एक सैनिक मारला तर त्यांचे दहा मारु म्हणत', 'आता आपले दहा शहीद होताना त्यांचा एक मारला जात आहे'. 56 इंच छातीवाले पाकिस्तानला उत्तर का देत नाहीत. नेभळट लोकांच्या हातून सत्ता काढल्याशिवाय आपल्याला डिवचणाऱ्यांना धडा शिकविता येणार नाही असेही पवार म्हणाले. 

इंदिरा गांधी, नेहरु, शास्त्री, नरसिंहराव, राजीव गांधी यांनी एकसंध ठेवलेल्या देशाच्या ऐक्याला सरकार सुरुंग लावत आहे. असा घणाघातही शरद पवार यांनी केला. 
पंतप्रधान फक्त मनकी बात ऐकवितात. पण, बेरोजगार, गृहीणी, अल्पसंख्यांक, शेतकऱ्यांचे दुखणे ऐकायला त्यांचे कान बहिरे झाले आहेत. मुस्लिमांत गरीबी, शिक्षणाचा अभाव अशा समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी धर्माच्या मुद्द्यात सरकार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी जयंत पाटील, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळंके, बजरंग सोनवणे, राजेंद्र जगताप, सय्यद सलिम, बाळासाहेब आजबे, अक्षय मुंदडा यांची भाषणे झाली. प्रास्ताविक संदीप क्षीरसागर यांनी केले.

शेतकरी आत्महत्येकडे डोकूनही पाहत नाहीत

शेतकरी हा देशाचा कणा आहे. कर्जबाजारीपणातून शेतकरी आत्महत्या होत आहेत. उद्योगपती आणि धनदांडग्यांनी बँकांचे बुडविलेले 81 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाझर फुटला. मात्र, शेतकरी आत्महत्यांकडे डोकून पहायला सरकारला वेळ नाही असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला. सत्तेत असताना 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. सध्या दुष्काळी परिस्थिती असून बीडसारखा दुष्काळ असेल तर शंभर टक्के कर्जमाफीची गरज आहे. पण, या सरकारला शेतकऱ्यांच दुखण दिसत नाही. यावेळी त्यांनी मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत आरक्षणाबाबतही सरकार टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप केला.

राफेलबाबत समर्थन नाही

राफेल खरेदीबाबत कोणाचेही समर्थन केलेले नाही. पुरावे नसल्याने वैयक्तीक आरोप करणार नाही असे म्हणालो होतो, असे शरद पवार म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT