महाराष्ट्र बातम्या

माझं मन व्यथित; प्रविणसारखं टोकाचं पाऊल उचलू नका- राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई  : आपला सहकारी प्रवीण चौगुले ह्याच्या निधनाच्या बातमीने माझं मन व्यथित झालं आहे. मला ईडीची नोटीस आली, ह्या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होतं, असे मनसेप्रमुख  राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत प्रवीणच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थनाही केली आहे.
 
राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, प्रवीणचं जसं माझ्यावर, पक्षावर प्रेम होतं तसंच तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे ह्याची मला जाणीव आहे. पण माझी तुम्हा सर्वाना कळकळीची विनंती आहे की कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. ह्या आधी देखील अनेक कठीण प्रसंगांमधून आपण बाहेर पडलो आहोत त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आपण ह्या प्रसंगावर देखील मात करू हे नक्की. 

ईडीसारख्या संस्थांना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना मी योग्य ती उत्तरं देईन. म्हणून मी पुन्हा सांगतो, तुम्ही सर्वानी शांतता राखा आणि कोणीही उद्या ईडीच्या कार्यालयाच्या जवळ कोणीही येऊ नका. कालच्या माझ्या सूचनेनंतर देखील अनेक जण ईडीच्या कार्यालयाजवळ येण्याचा विचार करत आहेत असं मला कळलं, तुमचं खरंच माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही तिथे येणार नाही, असेही राज यांनी म्हटले आहे. 

काल मी जे सांगितलं तेच पुन्हा सांगतो तुमच्या कुठल्याही कृतीने सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही अथवा सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही ह्याची काळजी घेण्याचेही आवाहनही राज यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

बाकी ह्या विषयावर जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच. तो पर्यंत तुम्ही सर्वानी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची नीट काळजी घ्या, असे राज ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘नाव लिहिलंय, आता तुझी पाळी’; ‘तांत्रिक डायरी’ बनली अत्याचाराचे शस्त्र, महिलेला १५ वर्षे छळलं, खरातनंतर ‘बडे बाबा’चा भंडाफोड

Gas supply: महाराष्ट्रात LPG कोट्यात 20% वाढ! छगन भुजबलांची मोठी घोषणा; मात्र एक अटही लागू होणार, कोणती अन् कधीपासून?

Ahilyanagar Gas Shortage: एक लाख ग्राहक गॅसच्या प्रतीक्षेत; अहिल्यानगर जिल्ह्यात दररोज २५ हजार सिलिंडरचे वाटप, हाॅटेल, रेस्टॉरंट उद्योगांना मर्यादा!

Virar News : धर्म स्वातंत्र्य कायद्याला कॅथलिक बिशप्सचा विरोध; संविधानिक अधिकारांवर गदा असल्याचा आरोप

Solapur politics: सोलापुरातील सिद्धेश्वर देवस्थानच्या भूमिकेने कोठे गट तोंडघशी; लिंगायत स्मशानभूमी प्रकरणातील राजकारण भाजपच्या अंगलट!

SCROLL FOR NEXT