police  esakal
महाराष्ट्र बातम्या

पोलिसांचा आदेश माहितीयं ना? मिरवणूक, मोर्चा, रॅली, आंदोलने अन्‌ सभांसाठी परवानगी बंधनकारक; ५ पेक्षा अधिक व्यक्तींच्या फिरण्यावरही निर्बंध

शहरात मिरवणुका, मोर्चा, रॅली, आंदोलने, निवेदने, धरणे व सभांसाठी पोलिस प्राधिकरणाची पूर्वपरवानगी बंधनकारक असल्याचे आदेश पोलि आयुक्तालयाने आज (सोमवारी) काढले आहेत. १९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत हा आदेश लागू असणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शहरात मिरवणुका, मोर्चा, रॅली, आंदोलने, निवेदने, धरणे व सभांसाठी पोलिस प्राधिकरणाची पूर्वपरवानगी बंधनकारक असल्याचे आदेश पोलि आयुक्तालयाने आज (सोमवारी) काढले आहेत. १९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत हा आदेश लागू असणार आहे.

राज्यातील सर्वाधिक प्रमाणात सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरे करणारे सोलापूर शहर आहे. १६ मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष, संघटनेच्या वतीने निवडणूक प्रचार सुरु होणार आहे. शहरात आगामी काळात रमजान रोजे प्रारंभ, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा सुरु आहे. धार्मिक स्थळांवरील भोंगे, मराठा, ओबीसी व धनगर आरक्षण अशा माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेला बाधा होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१चे कलम ३७ (३) नुसार हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या काळात शस्त्रे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या किंवा झेंडा असलेली काठी, इजा करण्यासाठी वापरता येईल अशा वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. आपल्या वागण्यातून किंवा कृतीतून इतर जमातीच्या भावना दुखावतील असे काहीही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ग्रामीण पोलिसांच्या पाच पथकांची रात्रंदिवस गस्त

निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अवैध दारु विक्री, निर्मिती व वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पाच पथके नेमली आहेत. आंतराज्य सीमेवर १२ ठिकाणी चेकपोस्ट नेमली आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील नऊ हजार गुन्हेगारांची यादी तयार केली असून त्यातील चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. उर्वरित गुन्हेगारांवरही कारवाई केली जाईल, असे अप्पर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. निवडणुकीसाठी जिल्ह्यात आणखी पोलिस बंदोबस्त लागणार असून त्याचे नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT