sakal exclusive sakal
महाराष्ट्र बातम्या

‘JN.१’ची लक्षणे माहिती आहेत का? सौम्य व्हायरस, लसीकरणामुळे धोका कमीच; वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने म्हणतात...घाबरू नका, काळजी घ्या

‘JN.१’ या नवीन व्हेरिएंटमध्ये फार बदल झालेला नाही. पाच महिन्यानंतर त्यात आणखी तीव्र बदलाची शक्यता फार कमी असते. संसर्ग जरी वाढला, तरी ताप- खोकल्यावर तो निघून जाईल. तो फुफ्फुसाला जास्त इन्फेक्शन करत नाही. पण, कोमॉर्बिड आहेत त्यांनी मास्क वापरावा.

तात्या लांडगे

सोलापूर : पाच महिन्यांतील ‘जेएन-वन’ या नवीन व्हेरिएंटमध्ये फार बदल झालेला नाही. पाच महिन्यानंतर त्यात आणखी तीव्र बदलाची शक्यता फार कमी असते. या व्हेरिएंटमुळे संसर्ग जरी वाढला, तरी ताप- खोकल्यावर तो निघून जाईल. तो फुफ्फुसाला जास्त इन्फेक्शन करत नाही. पण, जे कोमॉर्बिड आहेत, त्यांनी मास्क वापरावा, लस टोचून घ्यावी असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून केले आहे.

‘ओमायक्रॉन’च्या कुटुंबातील हा नवीन व्हायरस असून तो फुफ्फुसला संसर्ग करताना दिसत नाही. जगभरातील ४१ देशांमध्ये या जेएन-वन व्हायरसचे रूग्ण असून भारतात ८ डिसेंबरला त्याचा पहिला रूग्ण सापडला. पण, ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यांच्या काळात जेएन-वन व्हायरसमध्ये फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे पुढील काळात तो धोकादायक बनेल, अशी शक्यता कमीच असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.

लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, पण ज्यांना किडनीचे आजार, मधूमेह, एचआयव्ही आहे अशा लोकांसह ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी. गर्दीत जाताना मास्कचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले. सरकारच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रवासी येतात त्याठिकाणी विशेषत: विमानतळावर लक्ष ठेवायला हवे, असेही ते म्हणाले. लसीकरण केलेल्यांना या नवीन व्हायरसचा धोका नसून लस न घेतलेल्यांसह पूर्वीचे आजार असलेल्यांनी खबरदारी घ्यावी. काही लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार घ्यावेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘जेएन-वन’ व्हायरसची लक्षणे...

  • - सतत नाक गळणे

  • - घसा दुखणे तथा सारखे खवखवणे

  • - अंगात ताप मुरणे, सतत ताप

  • - डोके दुखणे, पोट दुखणे

  • - लूज मोशन होणे

------------------------------------------------------

अशी घ्यावी खबरदारी...

  • - पाणी भरपूर प्यावे

  • - कोमॉर्बिड रुग्णांनी मास्कचा वापर करावा

  • - लस न घेतलेल्यांनी लस घ्यावी

  • - ज्येष्ठांनी गर्दीत जाऊ नये किंवा मास्कचा वापरावे

  • - ताप आल्यानंतर अंगावर न काढता उपचार घ्यावेत

ताप- खोकल्यावरच तो निघून जाईल

ओमायक्रॉनच्या फॅमिलीतील हा जेएन-वन व्हायरस असून पूर्वीच्या व्हायरसमध्ये म्युटेशन झाल्याने यात संसर्ग करण्याची क्षमता आली आहे. पण, घाबरून न जाता प्रत्येकांनी काळजी घ्यावी. ‘डेल्टा’प्रमाणे हा घातक व्हायरस नसून ताप- खोकल्यावरच तो निघून जाईल. लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती प्रत्येकाकडे आली आहे. को-मॉर्बिड रुग्णांनी काळजी घ्यावी.

- डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT