map esakal
महाराष्ट्र बातम्या

तुम्हाला जमिनीचा, जागेचा नकाशा हवायं का? आता हेलपाटे नको, जोवरच मिळेल मोबाईलवर ऑनलाइन नकाशे

शेतकऱ्यांना त्यासाठी मोजणी कार्यालय किंवा सिटीसर्व्हेच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. पण, आता सरकारने सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा, जागेचा नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची व पैशांची बचत होणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शेतात ये-जा करण्यासाठी नवा रस्ता काढायचा असल्यास किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा गरजेचा असतो. शेतकऱ्यांना त्यासाठी मोजणी कार्यालय किंवा सिटी सर्व्हेच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. पण, आता सरकारने सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा व जागेचा नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची व पैशांची बचत होणार आहे.

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

१) जमिनीचा नकाशा ऑनलाइन काढण्यासाठी सर्वप्रथम गुगलवर mahabhunakasha.mahabhumi.gov.in वर सर्च करावे.

-----

२) त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, ‘कॅटेगरी’मध्ये रुरल (ग्रामीण) आणि अर्बन (शहरी) असे दोन पर्याय दिसतील. तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडावा.

----

३) तिसऱ्या टप्प्यावर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करावे. त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो. ‘होम’ या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्हाला हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहता येईल.

---

४) त्यानंतर डावीकडील + किंवा - या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो. पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसतात, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जाता येईल.

असा काढता येईल जमिनीचा नकाशा...

नकाशाच्या पेजवर search by plot number या नावाचा रकाना असून तेथे तुमच्या सातबारावरील गट क्रमांक टाका. त्यानंतर जमिनीचा गट नकाशा ओपन होतो. ‘होम’ या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करा आणि वजाबाकीचे (-) बटण दाबून पूर्ण नकाशा पाहू शकता. त्यानंतर डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची माहिती दिसेल.

एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती पाहता येईल. ही माहिती पाहिल्यावर डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यास तुमच्या जमिनीचा plot report दिसेल. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक करा आणि तुम्ही नकाशा डाऊनलोड करू घ्या.

ई-नकाशा प्रकल्प नेमका आहे काय?

भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवलेले असतात. त्या नकाशांद्वारे जमिनी व जागेच्या हद्दी कायम करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हे नकाशे महत्त्वाचे असतात. पण, हे नकाशे फार वर्षांपूर्वी म्हणजेच १८८० पासूनचे आहेत. त्यामुळे त्यांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी ‘ई-नकाशा’ हा प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे. त्याअंतर्गत तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत. या प्रकल्पामुळे डिजिटल सातबारा, ‘आठ-अ’सोबतच आता डिजिटल नकाशेही ऑनलाइन पाहता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

USA School Shooting : अमेरिकेतील शाळेत भयानक गोळीबार! तीनजण ठार, २० जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

SCROLL FOR NEXT