3corona_vaccine_registration.jpg 
महाराष्ट्र बातम्या

तुम्हाला कोरोनावरील लस टोचायची आहे का? लसीकरणाचा दिवस, केंद्र अन्‌ वेळेची 'अशी' मिळेल माहिती 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 16 जानेवारीपासून सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार असून प्रत्येक दिवशी 100 जणांना लस टोचली जाणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रांप्रमाणे जिल्हाभरात 12 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून त्यात शहरातील सर्वोपचार रुग्णालयासह पाच नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश, अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

लसीकरणासंबंधीचे ठळक मुद्दे... 

  • आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार पहिल्या टप्प्यात लस; दररोज शंभरजणांचे लसीकरण 
  • पोलिस, शिक्षक, महापालिका, जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश 
  • 50 वर्षांवरील व्यक्‍ती व 50 वर्षांखालील को- मॉर्बिड रुग्णांचे तिसऱ्या टप्प्यात लसीकरण 
  • सर्वांची ऑनलाइन होणार नोंदणी; आधार नंबर आणि मोबाइल क्रमांकाची माहिती बंधनकारक 
  • लसीकरणाची वेळ आणि दिवसाचा मोबाईलवर येणार मेसेज; एका तासात दहाजणांचे लसीकरण 

सोलापूर शहर- जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता कमी होऊ लागला आहे. आतापर्यंत शहरातील 11 हजार 339 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 613 जण दगावले आहेत. तर आतापर्यंत दहा हजार 390 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील 38 हजार 679 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 37 हजार 100 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. मात्र, एक हजार 142 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर- जिल्ह्यातील 50 वर्षांवरील व्यक्‍तींना व 50 वर्षांखालील को- मॉर्बिड रुग्णांना प्राधान्याने लस टोचली जाणार आहे. त्यांच्या लसीकरणाची व्यवस्था उपजिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रे व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये केल्याचे महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते यांनी सांगितले. सोलापुरात लस पोहचली असून शनिवारी (ता. 16) लसीकरणास शुभारंभ होईल, असेही ते म्हणाले.



'या' केंद्रांवर होणार लसीकरण 
अक्‍कलकोट, बार्शी, मंगळवेढा, मंद्रूप, सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयांच्या ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. तसेच अकलूज, पंढरपूर व करमाळा उपजिल्हा रुग्णालय, अश्‍विनी रुग्णालय , अश्‍विनी ग्रामीण रुग्णालय, कुंभारी यासह शहरातील दाराशा आणि सोलापूर शासकीय सर्वोपचार रुग्णालय याठिकाणी लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT