Healthy Lifestyle Habits esakal
महाराष्ट्र बातम्या

Healthy Lifestyle Habits: तुम्हाला, कायमचे निरोगी राहायचंय का? मग, दररोज पाळा सुदृढ आरोग्याची ‘ही’ पंचसूत्री

Healthy Lifestyle Habits: स्पर्धेच्या काळात प्रत्येकजण पैशाच्या मागे लागला आहे. पण, पैसा सर्वस्व नसून आरोग्य सुदृढ राहिल्यास पैसा आयुष्यात कधीही कमावता येईल. अपयश ही यशाची पहिली पायरी असल्याने कोणी नैराश्याचे शिकार होऊ नये. सुदृढ आरोग्यासाठी पंचसूत्रीचा अवलंब करा व कायमचे निरोगी राहा.

तात्या लांडगे

Healthy Lifestyle Habits: स्पर्धेच्या काळात प्रत्येकजण पैसा कमविण्याच्याच मागे लागला आहे. पण, पैसा हा सर्वस्व नसून आरोग्य सुदृढ राहिल्यास पैसा आयुष्यात कधीही कमावता येईल.

अपयश ही यशाची पहिली पायरी असल्याने कोणीही नैराश्याचे शिकार होऊ नये. सुदृढ आरोग्यासाठी पंचसूत्रीचा अवलंब करा आणि कायमचे निरोगी राहा, असे आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात.

१) सलग आठ तासाची झोप

आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे सकाळी ब्राह्मेमुहूर्त म्हणजेच सूर्योदयापूर्वी दीड तास अगोदर उठणे आवश्यक आहे. त्यावेळी हवा शुद्ध असते आणि हवेत जास्त प्रमाणात ऑक्सिजन असतो.

त्यावेळी मलमूत्र वेग देखील जास्त असल्याने मोशन जास्त व्यवस्थित होते. तत्पूर्वी, जेवण आणि झोप, त्यात किमान दोन तासांचे अंतर हवे. एकदा झोपल्यानंतर सलग आठ तासांची झोप, सुदृढ शरीरासाठी खूप फायद्याची ठरते.

२) सूर्यास्तापूर्वी जेवण

जेवण आणि झोपेत दररोज दोन तासांचे तरी अंतर असायलाच हवे. रात्री सात वाजण्यापूर्वी जेवण करणे शरीरासाठी फायद्याचे ठरते. सूर्य मावळतीकडे जात असताना जसे निसर्गातील फुले, ज्याप्रमाणे कोमेजतात, त्याच प्रमाणे आपल्या शरीरातील अवयवातील पोकळ्या आकुंचन पावत असतात.

त्यामुळे सुर्यास्तापूर्वी जेवण करावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. जास्तीत जास्त रात्री साडेनऊ ते दहापर्यंत झोप शरीर तंदुरुस्त राखते. जेवण कधीही पोटभर करू नये, थोडीशी जागा शिल्लक ठेवावी.

३) शरीरानुसार करा व्यायाम

सकाळी पहाटेच्या सुमारास चालणे, सूर्यनमस्कार जोर-बैठका हा व्यायाम शरीराची तंदुरुस्ती राखतो. कपाळावर घाम येईल एवढा व्यायाम असावा, आयुर्वेदात सांगितले आहे. रक्ताभिसरण वाढवायला हवे. दूरदूर रक्तप्रवाह खेळायला हवा.

योगासने, तरूणांनी स्नायू पिळण्याचे व्यायाम हवे. ज्येष्ठांच्या शरीराचे रक्ताभिसरण सुयोग्य व्हायला हवे. प्राणायाम, कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन याचे प्रमाण त्यातून सुयोग्य राहते.

आरोग्यातील केमिकल व्यवस्थित राहावेत. मानसिक द्वंद हेच मूळ आजाराचे कारण. इच्छा पूर्ण न झाल्यास द्वंद निर्माण होतो. त्यातूनच आजार वाढतात. १० ते १५ मिनिटे ध्यानधारणा करायला हवी.

४) मानसिक स्वास्थ्य

जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार मानवाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी मानसिकता चांगली गरजेची आहे. त्यात शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक, कौशल्यपूर्ण व आध्यात्मिक, अशा सहा बाबी महत्त्वपूर्ण आहेत.

त्याच्या आजूबाजूचे वातावरण नीट पाहिजे, त्याच्याकडे स्वत:चा उदरनिर्वाह भागेल असे किमान कौशल्य हवे. कोणत्याही गोष्टी मनावर घेऊन नैराश्यात जाऊ नये, प्रॅक्टिकल विचार करावा आणि त्याला अध्यात्माची जोड असावी. त्यातून निश्चितपणे मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहील.

५) सकारात्मकता

मानवी उत्क्रांती काळापासून भीती हा प्रकार अजूनही मनातून निघालेला नाही. प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती राहतेच. त्यातूनच असुरक्षित वाटत राहते. या पार्श्वभूमीवर देव ही संकल्पना त्यावेळी पुढे आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

त्यामुळे मनाला संरक्षित करण्यासाठी लोक देवाला मानतात. मनात सकारात्मक विचार असतील तर त्याचा परिणाम निश्चितपणे शारीरिक तंदुरुस्तीवर होतो, असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.

संत तुकाराम महाराज म्हणतात...

आयुष्यात कशाचीही चिंता करू नका, वायफळ बडबड नको, विनाकारण फिरू नका, अतिजेवण नकोच आणि दिवसरात्र झोपण्यात घालवू नका, याबद्दल संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून स्पष्टपणे सांगितले आहे.

संत तुकाराम महाराज म्हणतात, काळ सारावा चिंतनें । एकांतवासी गंगास्नानें । देवाचे पूजनें । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥ युक्त आहार विहार । नेम इंद्रियांसी सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥२॥ परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥३॥ देह समर्पिजे देवा । भार कांहीच न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥४॥.

सकारात्मक विचार, परोपकारी वृत्ती हवी

मनात कशाचीही भीती न बाळगता व चिंता न करता प्रत्येकांनी जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा. सकारात्मक विचार, परोपकारी वृत्ती ठेवावी. दररोज सूर्यनमस्कार, योगासने, चालणे, जोर-बैठका अशा प्रकारचा व्यायाम करावा. वेळेत व पुरेसी झोप घ्यावी आणि वेळेवर जेवण करावे.

- शिरीष कुलकर्णी, एम. डी. आयुर्वेद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Pune News: पुणेकरांना गुंठेवारीत दिलासा नाही! मुदतवाढ मिळाली, पण शुल्कात कपात नाही; जुन्याच दराने नियमितीकरण

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT