family property

 
Esakal
महाराष्ट्र बातम्या

सासू-सासऱ्याच्या संपत्तीत सून किंवा जावयाला हक्क असतो का? नातवंडाला आजी-आजोबाची इस्टेट मिळते का? वाचा...

स्वत: कमावलेली आणि वडिलोपार्जित, अशी दोन प्रकारची संपत्ती असते. एखाद्याला वडिलांकडून, आजोबांकडून किंवा पणजोबांकडून जी संपत्ती मिळते ती वडिलोपार्जित असते. जन्मानंतर त्या व्यक्तीचा वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो. एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबात तीन मुले असतील, पहिली वाटणी समान होते.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टराने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. त्यानंतर कौटुंबिक वादातून डॉक्टरच्या पत्नीने सूनेला घराबाहेर हाकलले. पतीही घरात घ्यायला त्यांना तयार नाहीत. त्यामुळे सासऱ्याच्या व पतीच्या संपत्तीत हक्क मिळावा म्हणून डॉक्टर सूनेने कायदेशीर लढाईचा निर्णय घेतला. पण, पती जिवंत असताना सासऱ्याच्या वडिलोपार्जित संपत्तीत सून हक्क सांगू शकत नाही. स्वत:च्या पैशातून घेतलेली संपत्ती वाटपाचा अधिकार सासू-सासऱ्यालाच आहे. त्यामुळे ती महिला (सून) सासऱ्याच्या संपत्तीत नव्हे तर पतीला मिळालेल्या हिश्श्यात किंवा त्याच्या संपत्तीत हक्क मागू शकते, असे विधिज्ञ सांगतात.

स्वत: कमावलेली आणि वडिलोपार्जित, अशी दोन प्रकारची संपत्ती असते. एखाद्याला वडिलांकडून, आजोबांकडून किंवा पणजोबांकडून जी संपत्ती मिळते ती वडिलोपार्जित असते. जन्मानंतर त्या व्यक्तीचा वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो. एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबात तीन मुले असतील, पहिली वाटणी समान होते. तिसऱ्या पिढीच्या मुलांना म्हणजेच त्या व्यक्तींची नातवंडांना ती संपती आपापल्या वडिलांच्या हिश्शातून मिळते. वडील स्वतःच्या इच्छेने संपत्ती कोणत्याही एकाच्या नावावर करू शकत नाहीत. त्याशिवाय कोणताही एक वारस संपूर्ण वडिलोपार्जित संपत्ती इतर वारसांच्या संमतीशिवाय विकू शकत नाही, असा कायदा आहे.

सासऱ्यांच्या मालमत्तेवर जावयाचा हक्क असतो का?

सासरे आणि जावयातील नातेसंबंध सामान्यतः वडील-मुलाचे मानले जाते. मात्र, हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार, सासू किंवा सासऱ्यांच्या संपत्तीवर जावयाचा कोणताही कायदेशीर हक्क नसतो. सासू किंवा सासऱ्यांनी स्वतः कमावलेली मालमत्ता कोणाला द्यायची, याचा संपूर्ण अधिकार त्यांचाच असतो. पत्नीच्या संमतीशिवाय किंवा सासू-सासऱ्यांच्या इच्छेशिवाय जावई त्या संपत्तीवर हक्क सांगू शकत नाही. पत्नीला वारसा हक्काने तिच्या वडिलांकडून काही मालमत्ता मिळाली असेल तरच त्यावर जावयाचा अधिकार असतो.

सासरच्या मालमत्तेवर सुनेचा अधिकार किती?

आई-वडिलांच्या मालमत्तेत मुलाचा अधिकार असतो, परंतु मुलाचे निधन झाल्यास त्याची पत्नी संपत्तीवर अधिकार मागू शकते का? असा प्रश्न आहे. खरेतर पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीवर पत्नीचा पहिला अधिकार मानला जातो. कुटुंबात वडिलोपार्जित मालमत्ता असल्यास पतीच्या निधनानंत सून त्यावर दावा करू शकते. मात्र, ती मालमत्ता सासू-सासऱ्यांची वडिलोपार्जित असावी. सासू-सासऱ्याने स्वत: खरेदी केलेल्या संपत्तीवर सून हक्क सांगू शकत नाही. सासू-सासरे त्यांनी कमावलेली मालमत्ता कोणालाही मृत्युपत्राद्वारे किंवा खरेदीद्वारे देऊ शकतात.

वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे...

मृत्युपत्र न करता एखाद्याचे निधन झाल्यास हिंदू वारसा कायदा- १९५६ मधील कलम ८ अंतर्गत त्या व्यक्तीची मालमत्ता त्याच्या ‘वर्ग १’ च्या कायदेशीर वारसांकडे (मुलगा, मुलगी, पत्नी, आई) जाते. त्यात प्रत्येकाला समान वाटा मिळतो. ज्या नातवंडांचे आई-वडील जिवंत आहेत, त्यांचा समावेश वर्ग १ च्या वारसांमध्ये होत नाही. जोपर्यंत वर्ग १ चा वारस असलेले आई किंवा वडील जिवंत आहेत, तोपर्यंत नातवंडांचा मालमत्तेत कोणताही वाटा नसतो. आजोबांच्या हयातीत मुलगा-मुलीचा मृत्यू झाल्यास आजोबांची मालमत्ता नातवंडांकडे हस्तांतरित होते.

...तरच सूनेला संपत्तीत हिस्सा मागण्याचा अधिकार

सासू-सासऱ्याच्या कोणत्याही (वडिलोपार्जित किंवा त्यांनी स्वत: कमावलेली) संपत्ती सून किंवा जावई हक्क सांगू शकत नाही. पतीचे निधन झाले असल्यास सासू-सासऱ्याकडून पतीला वडिलोपार्जित हिस्सा मिळाला नसल्यास सून त्यात हक्क मागू शकते. मात्र, पती जिवंत असताना ती सासू-सासऱ्याच्या संपत्तीवर हक्क मागू शकत नाही. तिला पतीच्याच संपत्तीत हक्क मागता येतो.

- प्रदिपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकिल, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT