devendra fadnavis and sushma andhare
devendra fadnavis and sushma andhare sakal
महाराष्ट्र

Sushma Andhare : देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला लाथ मारली पाहिजे, भाजपा सोडली पाहिजे

शर्मिला वाळुंज

हिंदुत्व जास्त महत्त्वाचे आहे असे म्हणत ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

डोंबिवली - उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली म्हणून हिंदुत्व सोडले अशी जर देवेंद्र फडणवीस यांची धारणा असेल. तर मग त्याच राष्ट्रवादीसोबत नागालँड मध्ये घरोबा करणारी भाजपा ही नकली हिंदुत्ववादी आहे, असाच याचा अर्थ होतो. म्हणजे देवेंद्र यांनी सुद्धा भाजपा सोडली पाहिजे आणि पूर्ण वेळ संघाचा कार्यकर्ता म्हणून फिरले पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांच्या पदाच्या खुर्चीला त्यांनी एका क्षणात लाथ मारली पाहिजे. आणि पूर्णपणे संघाचा कार्यकर्ता म्हणून जॉईन झाले पाहिजे. कारण हिंदुत्व जास्त महत्त्वाचे आहे असे म्हणत ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

शीतल म्हात्रे मार्फ व्हिडीओ प्रकरणात अटक करण्यात आलेले कल्याण मधील विनायक डावरे यांच्या कुटुंबियांची भेट ठाकरे गटाच्या उपनेत्या अंधारे यांनी मंगळवारी घेतली. कल्याणमध्ये त्या आल्या असता श्याम देशमुख यांच्या भाजपा प्रवेश आणि त्यावर फडणवीस यांनी उद्धव यांच्यावर केलेली टीका याला उत्तर देताना अंधारे यांनी वरील वक्तव्य करत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील अंधारे यांनी यावेळी निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली. तसंच याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 'गौरी भिडे हा चेहरा आहे, याच्यामागचा मास्टर माईंड शोधला पाहिजे. हाच मास्टर माईंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही चालवतो,' असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी ठरत आहेत -

शितल म्हात्रे यांचा पाठलाग केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे याविषयी अंधारे म्हणाल्या याचा अर्थ गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी ठरत आहेत. एखाद्या चर्चेत असलेल्या व्यक्तीचा जर पाठलाग होत असेल तर गृहमंत्रालय सबसे अपयशी ठरलेला आहे. यावर तात्काळ मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खाते काढून घेतले पाहिजे. आम्ही सांगत होतो तेव्हा पटलं नाही किमान मात्रे सांगतात त्यानिमित्ताने तरी हे मान्य केले गेले पाहिजे. व्हिडिओ मर्फिंग किंवा एडिटिंग ही संस्कृती आमची नाही, भाजपची संस्कृती आहे. पण आम्हाला त्यावर काही बोलायचे नाही, कारण आम्ही अत्यंत संयमी नेतृत्वाखाली काम करणारे लोक आहोत असे अंधारे म्हणाल्या.

किरीट सोमय्या यांनी हातोडा घेऊन जावे, त्यांना पार्ट टाईम पेमेंट मिळेल -

साई रिसॉर्ट प्रकरणांमध्ये 34 लोकांना परवानग्या मिळाल्या होत्या. 34 वे परब कसे काय दिसतात, आधीचे 33 लोकांचे काय? त्या 33 लोकांवर किरीट भाऊंनी बोललं पाहिजे. अनधिकृत बांधकाम विषय असेल तर एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 हजार 60 अनधिकृत बांधकामे आहेत. 2 हजार 59 लोकांचे काय यावर पण किरीट यांनी बोलले पाहिजे. चिवल्या बिचवर नारायण राणे यांचा बंगला आहे. ज्याला पाडण्याची कोर्टाने ऑर्डर दिली तरी ऐकली नाही. यावर कोर्टाने आता एक स्मरण पत्र कलेक्टर यांच्या नावाने लिहिले आहे. त्यावर काहीच कारवाई होत नाही. अतिक्रमण विभाग जर कामात असेल तर किरीट यांनी नेहमी प्रमाणे हातात हातोडा घेऊन जाण्यास काही हरकत नाही. पार्ट टाइम पेमेंट त्यांना मिळेल मग काय हरकत आहे असा सणसणीत टोला त्यांनी किरीट सोमय्या यांना लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT