uddhav thackeray 
महाराष्ट्र बातम्या

गाफीलपणा नको, कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी तुम्ही पोहोचा, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सोलापूर प्रशासनाला सूचना

प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोना आटोक्‍यात येतोय असा गाफीलपणा दाखवू नका. विषाणूचा संसर्ग होण्यापूर्वी प्रशासनाने त्यांच्यापर्यंत पोहोचून अतिशय काटेकोर आणि जलद पाऊल उचलावीत. घरोघरी तपासणी आणि चाचण्या वाढवा. रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवा. इमारती ऐवजी मोठे सभामंडप, गोडाऊन ताब्यात घेऊन सुविधा निर्माण करा अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या प्रशासनाला दिल्या आहेत. 

सोलापूरचे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिसीद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचीही उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मुंबईमध्ये चेस दि व्हायरस मोहीम प्रभावीपणे राबविली. तशीच पद्धत सोलापुरातही राबवा. पुढील काळातही खासगी डॉक्‍टर्सची सेवा घेणे, विलगीकरण सुविधा वाढविणे, 60 वर्षांच्या पुढील सर्वांची ऑक्‍सिजन पातळी तपासणे, त्यांना इतर कुठले आजार झाले आहेत ते पाहणे या बाबींना अधिक वेग देत असताना कंटेनमेंट झोन्सकडे अधिक लक्ष द्या. सोलापुरात विडी कामगार तसेच हातमाग, यंत्रमागातील कामगार मोठ्या संख्येने आहेत.

त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना आरोग्याच्या काही समस्या येत असतात, विशेषतः: फुफ्फुसे, श्वसनाशी संबंधित रोग मोठ्या प्रमाणावर आढळतो. तसेच त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. कोरोनाचा प्रादुर्भाव त्यांना लवकर होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन 
प्रशासनाने कोणत्याही दडपणाला बळी न पडता आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर द्यावा. सोयीसुविधासाठी लागणारी ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर, औषधे सर्व पुरविण्यात येईल. जिल्हाभर कोरोना दक्षता समितीने जागृतीचे काम करावे करण्याची सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले, कोरोनाशी लढताना जिल्हा प्रशासनाला ज्या काही कमतरता भासत असतील त्याची पूर्तता राज्य सरकारकडून तातडीने करण्यात येईल. अजोय मेहता म्हणाले, अतिशय काटेकोरपणे कोरोना रुग्णांचा शोध, त्यांचे जास्तीत जास्त संपर्क तपासणे, ऑक्‍सिजन व्यवस्था, रुग्णांना दिली जाणारी सेवा यावर भर दिल्यास मृत्यूदर कमी होईल. 

प्रभाग 6, 7, 8 मध्ये सर्वाधिक रुग्ण 
सोलापूर पालिकेच्या 6, 7, 8 प्रभागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत असून रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर या भागात लोकांचे इतरही जिल्ह्यातून येणे जाणे असल्याने रुग्ण संख्या वाढते आहे. विडी कामगारांच्या फुफ्फुसे, डोळे, हाताला इजा होण्याचे प्रमाण खूप आहे. याठिकाणी ताडी, तंबाखू सेवनाचे प्रमाणही जास्त असल्याचा मुद्दा पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यावेळी मांडला. पालिका आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, सोलापूरमध्ये 1300 खासगी डॉक्‍टर्स असून यापूर्वीही 33 डॉक्‍टर्सनी सेवा घेतली आहे. 12 एप्रिल रोजी सोलापुरात एक रुग्ण आढळला होता. 4 ते 3 जून दरम्यान 42 केसेस होत्या. 3 जूननंतर अचानक 1521 केसेस झाल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT